Central Railway Mumbai To Ahmadabad Google
मुंबई/पुणे

Coldplay Concert साठी मध्य रेल्वे सोडणार विशेष गाड्या; मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान धावणार ४ एसी स्पेशल ट्रेन, जाणून घ्या वेळ आणि थांबा

Central Railway Mumbai To Ahmadabad: प्रसिद्ध संगीत बँण्डचा "कोल्ड प्ले" च्या कार्यक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मध्य रेल्वे चार अतिरिक्त गाड्या सोडणार आहे.

Bharat Jadhav

मध्य रेल्वेने प्रवाशांच्या मागणीनुसार मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान ४ विशेष वातानुकूलित ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतलाय. या सेवांचा फायदा प्रसिद्ध संगीत बँण्डचा "कोल्ड प्ले" च्या कार्यक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या चाहत्यांनाही होईल. या विशेष ट्रेन कुठे थांबणार, कधी आणि कुठून निघणार याची माहिती जाणून घेऊ.

गाड्यांचा तपशील खालीलप्रमाणे

लोकमान्य टिळक टर्मिनस - अहमदाबाद - लोकमान्य टिळक टर्मिनस वातानुकूलित विशेष (२ सेवा)

01155 वातानुकूलित विशेष दि. २५.०१.२०२५ रोजी ००.५५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून सुटेल आणि अहमदाबाद येथे त्याच दिवशी ११.०० वाजता पोहोचेल. (१ सेवा)

01156 वातानुकूलित विशेष २६.०१.२०२५ रोजी ०२.०० वाजता अहमदाबाद येथून सुटेल आणि त्याच दिवशी ११.४५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल. (१ सेवा)

थांबे: ठाणे, भिवंडी रोड, कामण रोड, वसई रोड, वापी, उधना, सुरत आणि वडोदरा

संरचना: दोन प्रथमसह द्वितीय वातानुकूलित, ४ द्वितीय वातानुकूलित, १४ तृतीय वातानुकूलित आणि १ जनरेटर कार.

दादर- अहमदाबाद- दादर वातानुकूलित विशेष (२ सेवा)

01157 वातानुकूलित विशेष दि. २६.०१.२०२५ रोजी ००.३५ वाजता दादर येथून सुटेल आणि अहमदाबाद येथे त्याच दिवशी ११.०० वाजता पोहोचेल. (१ सेवा)

01158 वातानुकूलित विशेष दि. २७.०१.२०२५ रोजी ०२.०० वाजता अहमदाबाद येथून सुटेल आणि दादर येथे त्याच दिवशी १२.५५ वाजता पोहोचेल. (१ सेवा)

थांबे: ठाणे, भिवंडी रोड, कामण रोड, वसई रोड, वापी, उधना, सुरत आणि वडोदरा.

संरचना: दोन प्रथम वातानुकूलित, दोन प्रथमसह द्वितीय वातानुकूलित, १ द्वितीय वातानुकूलित, २ द्वितीयसह तृतीय वातानुकूलित, ९ तृतीय वातानुकूलित आणि २ द्वितीय सिटिंग सह गार्ड्स ब्रेक व्हॅन.

आरक्षण: विशेष ट्रेन क्रमांक 01155 आणि 01157 वातानुकूलित विशेषसाठी बुकिंग दि. २३.०१.२०२५ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.

विशेष गाड्यांच्या थांब्यावरील तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस अॅप डाउनलोड करा. प्रवाशांनी या विशेष रेल्वे सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

नवी मु्ंबई डीवाय पाटील स्टेडियम 'कोल्ड प्ले' चा कार्यक्रम झाल्यानंतर आता हा बँण्ड २५ आणि २६ जानेवारीला अहमदाबादमध्ये लाइव्ह परफॉर्म करणार आहे. तर कॉन्सर्टची तिकिटे खरेदी करता आली नाहीत, तर तुम्ही ते घरी बसून लाइव्ह पाहू शकता. कोल्डप्लेचा अहमदाबाद कॉन्सर्ट OTT वर लाइव्ह स्ट्रीम केला जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT