Pune Metro Stations : स्वारगेटमधील वाहतूक कोंडी सुटणार, दोन नवीन मेट्रो स्टेशन बनणार

Pune Metro Update : मंत्री माधुरी मिसाळ यांनी पुणे शहरातील विकासकामांचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलावली होती. त्यांनी पुणे शहरात दोन नवीन मेट्रो स्थानके प्रस्थावित करण्यात आल्याची माहिती दिली.
Pune Metro Stations
Pune Metro StationsSaam Tv
Published On

Pune Metro Update : पुण्यातील स्वारगेट ते कात्रज या मार्गावर दोन नवीन मेट्रो स्थानकांसाठी प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती नगरविकास आणि परिवहन मंत्री माधुरी मिसाळ यांनी दिली आहे. पुणे शहरातील मेट्रो प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी त्यांनी एक बैठक बोलवली होती. बैठकीनंतर माधुरी मिसाळ यांनी मेट्रो बांधकामासंबंधित अपडेट दिले.

माधुरी मिसाळ यांनी या संबंधित पोस्ट सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या पोस्टमध्ये त्यांनी 'शहरातील खडकवासला-खराडी मेट्रो मार्ग आणि एस.एन.डी.टी ते माणिकबाग मेट्रो जोडमार्ग हे दोन्ही प्रकल्प सध्या केंद्र सरकारडे प्रस्तावित आहेत. तर वनाज ते चांदणी चौक मेट्रो मार्ग तसेच रामवाडी ते विठ्ठलवाडी हे दोन मार्ग अंतिम मंजुरीसाठी राज्य कॅबिनेटकडे प्रस्तावित केले आहेत,' असे म्हटले आहे.

'तसेच वर्क ऑर्डर निघाल्यानंतर लगेचच कात्रज ते स्वारगेट मेट्रो मार्गाचे काम सुरू केले जाईल. यामुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. याच मार्गावर धनकवडी आणि बालाजीनगर मेट्रो स्थानक होण्यासाठी देखील प्रयत्न सुरू आहेत', अशी माहितीही माधुरी मिसाळ यांनी पोस्टद्वारे दिली आहे.

Pune Metro Stations
Maharashtra Politics: स्वबळावर लढायचं की आघाडीसोबत, २३ तारखेला ठरणार; ठाकरेंच्या शिलेदाराचे सूचक वक्तव्य

पुणे शहरात सुरळीतपणे वाहतूक व्हावी यासाठी परिवहन विभागांतर्गत शहरात रिक्षा स्टँड, बस स्टँड किती आहेत याचा आढावा घेतला जाईल आणि त्यानुसार रोडमॅप तयार केला जाईल असेही मिसाळ यांनी म्हटले आहे. या बैठकीला उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांना मिसाळ यांनी प्रलंबित कामे मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Pune Metro Stations
Kalyan News : कल्याणमधील ४०० विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात, २८ तारखेला शाळेवर कारवाई होणार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com