Maharashtra Politics: स्वबळावर लढायचं की आघाडीसोबत, २३ तारखेला ठरणार; ठाकरेंच्या शिलेदाराचे सूचक वक्तव्य

Mahavikas Aghadi: पिंपरी चिंचवड दौऱ्यावर असलेल्या सचिन अहिर यांनी आज आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शहरातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये त्यांनी २३ तारखेला उद्धव ठाकरे आगामी निवडणुकीबाबत निर्णय घेणार असल्याचे सांगितले.
Maharashtra Politics: स्वबळावर लढायचं की आघाडीसोबत, २३ तारखेला ठरणार; ठाकरेंच्या शिलेदाराचे सूचक वक्तव्य
Mahavikas Aghadi india today
Published On

गोपाळ मोटघरे, पिंपरी-चिंचवड

'आगामी महापालिका निवडणुका या महाविकास आघाडीत लढायच्या? की स्वबळावर लढवायच्या याचा सर्वस्वी निर्णय येत्या २३ तारखेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील.' अशी माहिती शिवसेनेचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिर यांनी दिली.

सचिन अहिरे हे पिंपरी चिंचवड शहराच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी हे विधान केले आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे २३ तारखेला काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पिंपरी चिंचवड दौऱ्यावर असलेल्या सचिन अहिर यांनी आज आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शहरातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. पिंपरी चिंचवड येथील शिवसेना भावनात त्यांनी ही बैठक घेतली. 'त्यांच्यासोबत आघाडी करायची, तेच आघाडीत राहतील का माहित नाही? त्यामुळे निवडणुका स्वतंत्र लढाव्यात असाही एक मतप्रवाह आहे.'

Maharashtra Politics: स्वबळावर लढायचं की आघाडीसोबत, २३ तारखेला ठरणार; ठाकरेंच्या शिलेदाराचे सूचक वक्तव्य
Maharashtra politics : शिवसेनेत धुसफूस; माजी मंत्री आक्रमक; एकनाथ शिंदेंकडे करणार पालकमंत्र्यांची तक्रार

'नाराज असले की एकनाथ शिंदे गावी जातात. एकनाथ शिंदे राजीनामा देतील आणि त्यांच्या जागी उदय सामंत येतील हे काय? असं काही लगेच होईल असं मला वाटत नाही.', असं मत सचिन अहिर यांनी शिवसेना शिंदे गटाच्या घडामोडींवर व्यक्त केले आहे.

Maharashtra Politics: स्वबळावर लढायचं की आघाडीसोबत, २३ तारखेला ठरणार; ठाकरेंच्या शिलेदाराचे सूचक वक्तव्य
Maharashtra Politics: सरकारमध्येच ६५ टक्के मंत्री गुन्हेगार प्रवृतीचे, सुव्यवस्थेची काय अपेक्षा करायची; पटोलेंचा सरकारवर हल्लाबोल

'एवढं बहुमत मिळूनही महायुतीत एक वाक्यता नाहिये. आधी मंत्रिमंडळ स्थापनेला विरोध आणि आता पालकमंत्री स्थगित, यांना पालकमंत्रिपद वर्चस्व टिकवायला हवं की अर्थकारणासाठी हे एकदा स्पष्ट व्हायला हवं.' अशी खोचक टीका देखील सचिन अहिर यांनी फडणवीस सरकारवर केली आहे.

Maharashtra Politics: स्वबळावर लढायचं की आघाडीसोबत, २३ तारखेला ठरणार; ठाकरेंच्या शिलेदाराचे सूचक वक्तव्य
Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप? एकनाथ शिंदेंना डावलून शिवसेनेत नवा 'उदय'? VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com