Maharashtra Politics: सरकारमध्येच ६५ टक्के मंत्री गुन्हेगार प्रवृतीचे, सुव्यवस्थेची काय अपेक्षा करायची; पटोलेंचा सरकारवर हल्लाबोल

Nana Patole Criticized Government: राज्यातील गुन्हेगारीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्य सरकारवर सणसणीत टीका केली. सरकारमध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक असल्यानं त्याच्याकडून कायदा सुव्यवस्थेची अपेक्षा ठेवता येणार नाही.
Nana Patole
Nana Patole Criticized Government:Saam tv
Published On

नाशिकमधील मूकबधीर मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारवर सणसणीत टोला लगावलाय. राज्यातील वाढत्या गुन्हेगारीवरून विरोधकांनी सरकार टीका केली जात आहे. महाराष्ट्रात कायदा सु्व्यवस्था राहिली नाही. सरकारमध्येच ६५ टक्के मंत्री गुन्हेगार आहेत, त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार असा सणसणीत टोला नाना पटोलेंनी लगावलाय.

बदलापूर बलात्कार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणी न्यायालयीन चौकशीचा अहवाल आज मुंबई हायकोर्टात सादर करण्यात आला. अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर प्रकरणात ५ पोलिसांना जबाबदार ठरवण्यात आले आहे. त्यावरून बोलतांना नाना पटोले यांनी सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात बसवलंय. बदलापूरच्या घटना खऱ्या अर्थाने राज्याला काळिमा फासणारी होती. सरकारचे पोसलेले भक्षकाना वाचवण्यासाठी प्रयत्न केले.

त्यामुळे फिंगरप्रिट नसल्याचं समोर आले.आरोपीना वाचवण्यासाठी प्रयत्न केला गेला आहे, असा आरोप नाना पटोले यांनी केलाय. या प्रकरणातील सगळे तथ्य पुढे आणून आरोपींवर कारवाई व्हावी अशी काँग्रेसची मागणी असल्याची नाना पटोले म्हणालेत.

Nana Patole
Ajit Pawar News: आगामी निवडणुकीसाठी अजित पवारांनी रणशिंग फुंकलं; कार्यकर्त्यांनाही दिला कानमंत्र, म्हणााले...

नाशिकमध्ये आज एका मूकबधीर मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली. यावरून काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारच्या मंत्र्यावर टीका केलीय. महाराष्ट्र कायदा सु्व्यवस्था राहिली नाहीये. गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिला नाहीये. गु्न्हेगारांना रानमोकळे झाले आहे. सरकारमध्ये ६५ टक्के मंत्री हे गुन्हेगार प्रवृत्तीचे आहे, त्यामुळे त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार असा आरोप नाना पटोले यांनी केलाय.

Nana Patole
Maharashtra Politics: 'शिंदेना संपवणार, नवीन उदय होणार, विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान; रोख कुणाकडे?

राहुल शेवाळेंच्या दाव्यावर काय म्हणाले प्रदेशाध्यक्ष

येत्या दोन तीन दिवसात राजकीय भूकंप होणार असल्याचा दावा शिवसेना नेते राहुल शेवाळे यांनी केला. त्यावर बोलतांना नाना पटोले म्हणाले बेईमानी निवडून आलेले सरकार आहे. चोरी आणि डाका टाकण्याची त्यांची मानसिकता आहे, हे आमदार चोरणार ते चोरणार असं सांगायचं. ह्याची हीच मानसिकता आहे. महाराष्ट्र राज्य छत्रपती शिवाजी महाराज यांना मानणारे आहे, पण सत्तेत मात्र डाकू बसलेत असा गंभीर आरोप नाना पटोले यांनी केलाय.

सत्तेतील लोकांना मलाईदार खाती हवी

या सरकारमध्ये वाद किती आहे, खाते वाटप करायला वेळ गेला, पालकमंत्री देण्यासाठी ही वाद झाला. एकीकडे मुख्यमंत्री 100 दिवसात रिझल्ट द्यायचं म्हणतात...या सरकारमध्ये विवाद आहे, एकीकडे मुख्यमंत्री दावोसला गेले असताना नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदासाठी स्थगिती द्यावी लागली...या सरकारमध्ये आल बेल नाही... हे सरकार कुठल्या उंबरठ्यावर उभा आहे वाद विवाद की मलाईदार व्यवस्थेवर हे यातून स्पष्ट होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com