Kalyan News : कल्याणमधील ४०० विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात, २८ तारखेला शाळेवर कारवाई होणार

Kalyan School News : रेल्वेने कल्याणमधील एका शाळेला नोटीस पाठवली आहे. प्रशासनाने शाळा रिकामी करा असे नोटीसमध्ये म्हटले आहे. रेल्वेच्या या निर्णयाला शिक्षक, विद्यार्थ्यांसह पालकांनी विरोध केला आहे.
Kalyan School News
Kalyan School NewsMeta Ai
Published On

अभिजीत देशमुख, साम टीव्ही, प्रतिनिधी

Kalyan News : कल्याण पूर्वला वालधुनी परिसरात एका शाळेला रेल्वे प्रशासनाने नोटीस पाठवली आहे. २८ जानेवारीपर्यंत शाळा रिकामी करा असा आदेश रेल्वे प्रशासनाने दिला आहे. या आदेशाला शिक्षक, पालक यांच्यासह विद्यार्थ्यांनी विरोध दर्शवला आहे. ही शाळा रेल्वेच्या जागेवर आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासन शाळेवर कारवाई करत आहे.

कल्याण पूर्व वालधुनी परिसरात रेल्वे हॉस्पिटल समोरच्या रेल्वेच्या जागेत सोशल वेल्फेअर इंग्लिश स्कूल अशी शाळा आहे. सहा महिन्यांपूर्वी रेल्वेने शाळेला नोटीस पाठवत शाळा बेकायदेशीर आहे असे सांगून ती रिकामी करण्याचे निर्देश दिले होते. आज (२१ जानेवारी) रेल्वेचे अधिकारी पोलीस फौजफाट्यासह शाळेवर कारवाई करण्यासाठी दाखल झाले. या कारवाईला शाळेतील शिक्षक, विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांनी विरोध दर्शवला आहे.

शाळेचे संचालक ज्ञानेश्वर मराठे यांनी या प्रकरणावर भाष्य केले आहे. ते म्हणाले, ही शाळा १९६८ पासून या जागेवर आहे. रेल्वेने पाठवलेल्या नोटीसमध्ये पंधरा दिवसात भाड्याचे २ कोटी ४४ लाख रुपये भरा अन्यथा शाळा खाली करा असे नमूद करण्यात आले आहे. आमच्या संस्थेला इतके पैसे भरणे शक्य नाही.

ज्ञानेश्वर मराठे पुढे म्हणाले, आता दोन महिन्यांवर मुलांच्या परीक्षा आहेत. दहावीच्या विद्यार्थ्यांच्या पूर्वपरीक्षा सुरु आहेत. रेल्वे प्रशासनाच्या या कारवाईच्या विरोधात आम्ही कल्याण न्यायालयात धाव घेतली आहे. ही सुनावणी न्यायालयात प्रलंबित आहे. रेल्वेने आम्हाला मुदत द्यावी. कारवाई केल्यास विद्यार्थ्यांचेे शैक्षणिक भवितव्य अंधारात जाईल.

Kalyan School News
Mumbai Crime: 'वाईड' बॉलमुळे खूप वाईट घडलं! दोन गटात तुफान राडा; लाथा बुक्क्यांनी तुडवलं, बॅट डोक्यात टाकली

कल्याणमधील माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनीही रेल्वेच्या कारवाईचा विरोध केला आहे. विकासाला आमचा विरोध नाही, मात्र या शाळेत ४०० विद्यार्थी शिकत आहे. त्यामुळे कारवाई करण्यापूर्वी आधी शाळेला जागी उपलब्ध करुन द्यावी मग ही कारवाई करावी अशी मागणी महेश गायकवाड यांनी केली आहे.

Kalyan School News
Bhandup Dream Mall: भांडुपमधील मॉलच्या बेसमेंटमध्ये आढळला महिलेचा मृतदेह, परिसरात खळबळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com