Mumbai Crime: 'वाईड' बॉलमुळे खूप वाईट घडलं! दोन गटात तुफान राडा; लाथा बुक्क्यांनी तुडवलं, बॅट डोक्यात टाकली

Fight Over Wide Ball In Cricket: क्रिकेट खेळत असताना वाईड बॉलवरुन झालेल्या वादामुळे एकाला जबर मारहाण करण्यात आली आहे.
Mumbai Crime: 'वाईड' बॉलमुळे खूप वाईट घडलं! दोन गटात तुफान राडा; लाथा बुक्क्यांनी तुडवलं, बॅट डोक्यात टाकली
mumbai crimesaam tv
Published On

क्रिकेटमध्ये दोन्ही संघांना सामना जिंकण्याची समान संधी असते. मात्र एका चुकीच्या निर्णयामुळे सामना फिरतो. त्या चुकीच्या निर्णयावरुन वादही होतात. असाच काहीसा वाद वाईड चेंडूवर घडल्याचे पाहायला मिळाले आहे.

वाईड चेंडूवरुन इतकी वाईट घटना घडली की, त्या खेळाडूला रुग्णालयात भरती करावं लागलं. तर चारकोप पोलिस स्थानकात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mumbai Crime: 'वाईड' बॉलमुळे खूप वाईट घडलं! दोन गटात तुफान राडा; लाथा बुक्क्यांनी तुडवलं, बॅट डोक्यात टाकली
Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर तीन दिवस ट्रॉफिक ब्लॉक; कधी, केव्हा आणि कुठे? वाचा

नेमकं काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी संध्याकाळी ४ च्या सुमारास चारकोप गावातील डिगेंश्वर मंदिराजवळ असलेल्या मैदानात क्रिकेटचा सामना सुरु होता. या सामन्यात वाईड चेंडूवरुन झालेल्या वादातून आयाज सरवारवर जीवघेणा हल्ला करण्यात आल्या. या हल्ल्यात आयाजच्या डोक्याला आणि पाठीवर जखमा झाल्या आहेत. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Mumbai Crime: 'वाईड' बॉलमुळे खूप वाईट घडलं! दोन गटात तुफान राडा; लाथा बुक्क्यांनी तुडवलं, बॅट डोक्यात टाकली
Crime : पुणे हादरलं! मित्रासोबत दारू पार्टी करायला गेला, नकळत बंदुकीचा ट्रिगर दबला अन् विपरीत घडलं

आयाज सरवारने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार , तो आपल्या मित्रांसह सुट्टीच्या दिवशी कांदिवलीतील एकता नगरच्या मैदानावर क्रिकेट खेळायचा. मात्र ज्या दिवशी हा हल्ला झाला, त्यादिवशी एकता नगरच्या मैदानावर क्रिकेटचे सामने सुरु होते. त्यामुळे आयाज आणि त्याच्या मित्रांनी डिंगेश्वर मंदिराजवळच्या मैदानावर जाऊन खेळण्याचा निर्णय घेतला.

ज्यावेळी आयाज आणि त्याचे मित्र डिंगेश्वर मंदिराजवळच्या मैदानावर गेले त्यावेळी काही मुलं तिथे क्रिकेट खेळत होती. त्या मुलांनी आयाजच्या संघाला मॅच खेळण्यासाठी विचारलं. दोन्ही संघ सामना खेळण्यासाठी मैदानात उतरले.

Mumbai Crime: 'वाईड' बॉलमुळे खूप वाईट घडलं! दोन गटात तुफान राडा; लाथा बुक्क्यांनी तुडवलं, बॅट डोक्यात टाकली
Dhule Crime : धुळे हादरले; भर चौकात तरुणाचा खून, हेडफोन गिफ्ट देण्यावरून वाद विकोपाला

पहिल्या सामना आयाजच्या संघाने जिंकला. आयाजचा संघ दुसरा सामनाही जिंकायलाच आला होता, इतक्यात विरोधी संघातील खेळाडूंनी चिडायला सुरुवात केली. त्यांनी वाईड चेंडूवरुन वाद घातला. हा वाद विकोपाला जाऊन पोहोचला. कारण त्यांनी बॅटने हल्ला चढवला. सगळे खेळाडू पळून गेले, पण आयाज त्यांच्या हाती सापडला.

आयाजला त्यांनी लाथेने आणि बॅटने मारायला सुरुवात केली. आयाजला जबर मारहाण झाली, काही मित्रांनी मध्ये पडून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. पण दोघांनी काही ऐकलं नाही. त्यांनी आयाजच्या डोक्याला मारणं सुरुच ठेवलं. या हल्ल्यात आयाज गंभीर दुखापतग्रस्त झाला आहे. दरम्यान पोलिसांनी दोघांवरही BNS च्या कलम ११८(२), ३५२, ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com