Coastal Road Saam Tv
मुंबई/पुणे

Coastal Road: मुंबईकरांसाठी गुडन्यूज! मरिन ड्राइव्ह ते वरळी गाठा अवघ्या १० मिनिटांत, कोस्टल रोडचा दुसरा बोगदा आजपासून सुरू

Coastal Road Second Tunnel Begins Today Marine Drive To Worli: कोस्टल रोडचा दुसरा बोगदा आजपासून सुरू होणार आहे. मुख्यमंत्री आज दुपारी पाहणी करणार आहेत.

Rohini Gudaghe

मुंबईकरांसाठी गुडन्यूज आहे. मरिन ड्राइव्ह ते वरळी हे अंतर आता फक्त दहा मिनिटांत गाठता येणार आहे. कारण आजपासून कोस्टल रोडचा दुसरा बोगदा सुरू होणार आहे. मुख्यमंत्री या बोगद्याला भेट देणार आहेत. ते कोस्टल रोडच्या दुसऱ्या बोगद्याची पाहणी करणार आहेत. त्यानंतर हा बोगदा सुरू होणार असल्याची माहिती मिळत आहे. मुंबईकरांचा प्रवास जलद आणि अधिक सोईस्कर व्हावा, हा कोस्टल रोड प्रकल्पाचा उद्देश आहे.

महापालिकेच्या कोस्टल रोड प्रकल्पाचा मरिन ड्राइव्हपासून सुरू होणारा हा दुसरा बोगदा (Mumbai News) आहे. तो उत्तर दिशेकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. या दृष्टीने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या बोगद्याची पाहणी करणार आहेत. त्यानंतर ११ जूनपासून सकाळी ७ ते रात्री ११ वाजेपर्यंत म्हणजे एकूण १६ तासांच्या कालावधीसाठी हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार (Coastal Road) आहे.

कोणता प्रवास सोईस्कर होणार?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केल्यानंतर मरिन ड्राइव्ह परिसर ते हाजी अली हा मार्ग खुला होत आहे. हा मार्ग सुमारे ६.२५ किलोमीटरचा आहे. या मार्गामध्ये अमरसन्स उद्यान आणि हाजी अली येथील (Coastal Road Second Tunnel) अंतरमार्गिकांचा वापर देखील करता येणार आहे. या आंतरमार्गिकांमुळे शहराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये होणारी वाहतूक अधिक सुलभ होणार आहे. प्रामुख्याने बॅ. रजनी पटेल चौकामधून पुढे वरळी, वांद्रेच्या दिशेने तर वत्सलाबाई देसाई चौकामधून पुढे ताडदेव, महालक्ष्मी, पेडर रोडकडे जाणाऱ्या वाहनांची मोठी सोय होणार आहे.

आठवड्यातील पाच दिवसांसाठी वाहतूक सुरू

दर आठवड्यात हा पाच दिवस हा मार्ग वाहतुकीसाठी खुला असणार आहे. सोमवार ते शुक्रवार या मार्गावर वाहतूक सुरू राहणार आहे. तर प्रकल्पाची उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी शनिवार आणि रविवार बंद राहणार आहे. ११ मार्च २०२४ रोजी कोस्टल रोडची दक्षिण मार्गिका ( Marine Drive To Worli) वाहतुकीसाठी सुरू करण्यात आली होती. याचा मुंबईकरांना मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे. कोस्टल रोडची आता दुसरी मार्गिका आठवड्यातील पाच दिवसांसाठी खुली करण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Stunt Artist Raju Death : सिनेमाच्या सेटवर मोठी दुर्घटना; प्रसिद्ध कलाकाराचा जागीच मृत्यू

प्रवीण गायकवाड यांना काळं फासलं; संभाजी ब्रिगेड आक्रमक

युतीसाठी ठाकरेसेनेचं रोखठोक,ठाकरेंचा चेंडू शिवतीर्थच्या कोर्टात,राज ठाकरेंचे मौन कधी सुटणार?

Mumbai : मुंबईत हवालदारानं स्वत:ला संपवलं, घरात संशयास्पद अवस्थेत आढळला मृतदेह

कुलूपबंद मदिरा, रोखल्या नजरा,मद्यपींचे होणार वांदे, सोमवारी ड्राय डे?

SCROLL FOR NEXT