Mumbai Costal Road: कोस्टल रोडवरुन उद्घाटनानंतर २४ तासांत किती वाहनांनी केला प्रवास? आकडेवारी आली समोर

Mumbai Costal Road News: सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोस्टल रोडचे उद्घाटन पार पडले. उद्घाटनानंतर अवघ्या २४ तासांतच १६ हजारहून अधिक वाहनांनी या मार्गाहून प्रवास केला.
Mumbai Costal Road
Mumbai Costal RoadSaam Tv

Travel On Mumbai Costal Road

कोस्टल रोडचे उद्घाटन (Mumbai Costal Road Inaguration) होताच अवघ्या २४ तासांतच १६ हजारहून अधिक वाहनांनी या मार्गाहून प्रवास केला आहे. त्यातही दुपारी तीन ते चार यावेळेत येणाऱ्या वाहनांची संख्या सर्वात जास्त होती. सोमवारी (११ मार्च) मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोस्टल रोडचे उद्घाटन पार पडले. त्यानंतर मंगळवारी सकाळपासून हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. (latest marathi news)

मात्र संध्याकाळी उपनगरात जाणाऱ्या गाड्यांची संख्या वाढली. त्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वरळीतून प्रवेशमार्ग रात्री आठऐवजी संध्याकाळी पाच वाजताच बंद करण्यात (Vehicles Traveled On Mumbai Costal Road) आला. आता वरळीतील प्रवेशमार्ग रोज पाच वाजता बंद केला जाणार आहे. या मार्गामुळे प्रवासाच्या वेळेत मोठी बचत होत आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कोस्टल रोडवर वाहनांची वाहतूक

पहिल्याच दिवशी या मार्गावरून सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत तब्बल १६ हजार ३३१ वाहनांनी प्रवास केला. यामध्ये सकाळी ११ वाजल्यानंतर वाहनांची संख्या तासागणिक वाढत गेली. दुपारी तीन ते चार या वेळेत सर्वाधिक वाहनांनी प्रवास (Mumbai Costal Road) केला. या कालावधीत १ हजार ९४७ वाहनांनी प्रवास केला.

मुंबईतील कोस्टल रोडवर वरळी ते मरीन ड्राइव्ह या मार्गिकेवर आठवड्यातील सोमवार ते शुक्रवार असे पाच दिवस प्रवास करता येईल. या ५ दिवसात सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत वाहतुकीसाठी वेळ असणार ( (Mumbai Costal Road News) आहे. तर शनिवारी आणि रविवारी या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद असेल.

Mumbai Costal Road
Mumbai Costal Road च्या कामाची Eknath Shinde व Devendra Fadnavis यांच्याकडून पाहणी

१४ हजार कोटींचा प्रकल्प

कोस्टल रोड प्रकल्प एकूण १०.५८ किलोमीटर लांब (Mumbai Costal Road Update) आहे. या प्रकल्पासाठी १४ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. या प्रकल्पात भरणीवरील रस्ते, पूल, उन्नत रस्ते यांचा समावेश आहे.

या कोस्टड रोडमुळे प्रवासाचा वेळ आणि इंधन या दोन्हींची बचत होणार आहे. या रोडचा पहिला टप्पा मुंबईच्या दक्षिणेला प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वरळी-वांद्रे सागरी सेतूचं वरळी टोक असा आहे. कोस्टल रोड वरळीकडून मरीन ड्राइव्हच्या दिशेने आता प्रवासासाठी खुला करण्यात येणार आहे.

Mumbai Costal Road
Mumbai Costal Road Map News : मुंबई मधील कोस्टल रोड कुठून कसा जाणार? जाणून घ्या!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com