Uddhav Thackeray  Saam Tv
मुंबई/पुणे

CM Uddhav Thackeray: सरकार तुमच्या पाठीशी नाही तर सोबत - मुख्यमंत्री

मी फक्त तुझ्या पाठीशी नाही, तर तुझ्या सोबत आहे, असं हे सरकार आहे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भूषण शिंदे -

मुंबई: आज गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर मुंबईमधील कफ परेडमध्ये स्थित वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये गृह विभागाच्या डायल 112 आणि महिला व बालक सायबर गुन्हे प्रतिबंध केंद्र प्रकल्पाचे उद्धघाटन सोहळा पार पडला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हीसी मार्फत या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. तसेच, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील देखील उपस्थित होते. त्यासोबतच, पोलीस महासंचालक रजनीश देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.

मास्क मुक्ती (Mask Free) आपण केली असली तरी मास्क घालणे अपरिहार्य आहे. कोरोना असो किंवा नसो पण पोलीस कामाला जात असतात. सणसमारंभ असला की ते कामावर असतात, या कार्यक्रमाला उपस्थित राहणं माझं कर्तव्य आहे. मी फक्त तुझ्या पाठीशी नाही, तर तुझ्या सोबत आहे, असं हे सरकार आहे. आपण नेहमी पोलिसांबाबत साकारत्म काम केलं आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) म्हणाले .

काही जणांना ही कामं दिसत नाही. मग पोलिसांना (Mumbai Police) माफिया म्हणून आणि आणखी काही म्हणा, मग ते विसरतात की हे आपले सुद्धा रक्षक आहे. आधी वेगळा गणवेश त्यांचा होता. आता आधुनिक होत गेला.

मुंबईवर अतिरेकी हल्ला झाला, तेव्हा अशा आतंकवाद्यांशी लढणे अशक्य होतं. मात्र, तुकाराम ओंबळे यांनी शूरपणा दाखवत त्या नराधमाला मारत शहीद झाले. पण, त्याला पकडून दिला, अशी माहिती त्यांनी दिली.

आज वाहने अद्यावत आहेत आणि पोलीस देखील सक्षम आहे. आज रात्री अपरात्री एकटं फिरताना एकटं वाटत नाही. कारण, पोलीस सोबत असतात. डायल 112 डायल केल्यावर तात्काळ मदत मिळणार आहे. कोणी काही वावड्या उठवल्या तरी सरकार मजबुतीने काम करत राहील. सरकार तुमच्या पाठीशी नाही तर सोबत आहे, असंही ते म्हणाले.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: रुग्णवाहिकेला रस्ता न देणे महागात पडले, पोलिसांनी शिकवल धडा, लाखोंचा दंड, लायसन्सही रद्द, Video बघाच

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! दर महिन्याला मिळणार ९००० रुपये; कसं? जाणून घ्या

Success Story: IIT मुंबईमधून शिक्षण, लाखोंची नोकरी नाकारली, अवघ्या २२ व्या वर्षी UPSC क्रॅक ;IAS सिमी करण यांची सक्सेस स्टोरी

Shukra Gochar 2024: नोव्हेंबर अखेरीस शुक्राचं नक्षत्र गोचर वाढवणार डोकेदुखी; आर्थिक हानी होण्याचा धोका

Air Pollution : राजधानीची हवा अत्यंत विषारी! शाळा बंद, वाहनांना बंदी, दिल्लीमध्ये अनेक निर्बंध

SCROLL FOR NEXT