Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Saam TV
मुंबई/पुणे

हे सर्व भाजपनेच केलंय, त्यांची आग्र्याहून सुटका करावीच लागेल : उद्धव ठाकरे

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केल्यानंतर आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. शिवसेना भवनात आज पक्षाच्या जिल्ह्याप्रमुखांची बैठक झाली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला. हा भाजपचा (BJP) डाव असल्याचा आरोपा त्यांनी केला आहे. इतकंच नाही तर, शिवसैनिकांची आग्र्याहून सुटका करावी लागेल असं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. (CM Uddhav Thackeray Latest News)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलताना म्हणाले की, “मी त्या दिवशी मनातलं सगळं सांगितलं, आजही मन मोकळं करणार आहे. मी वर्षा सोडली म्हणजे मोह, जिद्द सोडलेली नाही. स्वप्नातही या पदावर जाईन असा विचार केला नव्हता. त्या पदाचा मला कधीच मोह नव्हता, मानेची शस्त्रक्रिया केली तेव्हा मोदींनीही मला फार हिंमतीचं काम केलं असं सांगितलं होतं. त्यावेळी मी हिंमत माझ्या रक्तात आहे सांगितलं होतं,” अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिली.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शिवसैनिकांशी, पक्षातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. या संवादावेळी त्यांनी शिवसैनिकांना उद्देशून मार्गदर्शन केलं. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुख्मयंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला. या संवादादरम्यान त्यांनी एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडावर निशाणा साधताना महत्त्वाचं वक्तव्य केलं. झाडाची फळं मेली, तरी मूळ मरू शकत नाही, असं वक्तव्य त्यांनी केलंय. तसंच मी वर्षावरुन मातोश्रीवर गेलोय. मी मोह सोडलाय. जिद्द सोडलेली नाही, असं देखील ते म्हणाले.

“जो कोणी समोर येईल त्याच्यावर मी विश्वास ठेवेन. शिवसेनेचा पहिला नारळ फुटला होता तशीच परिस्थिती आहे समजा,” असं आवाहन उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना केलं आहे. “तुम्हाला तिथे भवितव्य दिसत असेल तर खुशाल जावा, मी थांबवणार नाही. तुम्हाला वाटत असेल तर सांगा मी हे पद आनंदाने सोडण्यास तयार आहे,” असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

तसेच एकनाथ शिंदे यांचं बंड केलं त्याला भाजप जबाबदार आहे. त्यांनीच शिंदेंना फुस लावली. हे सगळं भाजपनेच केलंय, या आमदारांची आग्र्याहून सुटका करावीच लागेल, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर गंभीर आरोप देखील केला आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mithun Rashi Personality : मिथुन राशीची लोक कशी असतात? त्यांचा स्वभाव नेमका कसा असतो? जाणून घ्या राशीबद्दल

Horoscope Today : सुखाची बरसात होईल, संधीचे सोने करून घ्या; जाणून घ्या तुमचे रविवारचे राशिभविष्य

Rashi Bhavishya: 'या' राशींसाठी रविवार खास, पैशांची होणार बरसात

Jammu and Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये दोन ठिकाणी दहशतवादी हल्ले; पर्यटक आणि भाजपच्या नेत्यावर गोळीबार

Relationship Tips: लग्नाआधी भावी जीवन साथीदाराला विचारा 'हे' ३ प्रश्न; नाहीतर आयुष्यात येतील दुःख

SCROLL FOR NEXT