मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केलेल्या भावनिक आवाहनानंतरही शिवसेना नेत्यांनी बंड सुरूच ठेवलं आहे. अशातच एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आता दिल्लीला रवाना होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गेल्या 2 तासांपासून एकनाथ शिंदे हे गुवाहाटीच्या हॉटेलमधून बाहेर पडले होते. त्यानंतर ते मुंबईत येणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, एकनाथ शिंदे कुठेही गेले नसून हॉटेलमध्ये परतले असल्याची माहिती आहे. (Eknath Shinde Latest Marathi News)
एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा फडकविल्यानंतर शिवसेनेत ठाकरे आणि शिंदे असे दोन गट पडले आहे. शिंदे यांचा गट भाजपसोबत सत्ता स्थापन करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. शिंदे यांच्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले असून सरकार लवकरच कोसळेल अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा फेसबुक लाईव्ह करत महाराष्ट्रातील शिवसेना जिल्हाप्रमुखांसोबत संवाद साधला आहे. आपल्याला शिवसेनेला पुन्हा नव्याने पालवी फोडावी लागेल असं ठाकरे यांनी म्हटलं आहे. दरम्यान, शिवसेनेतून बंड केल्यानंतर आता एकनाथ शिंदेसह जवळपास 40 शिवसेना आमदार गुवाहाटी येथील एका हॉटेलमध्ये वास्तव्यास आहे. दुपारी एकनाथ शिंदे हे एकटेच हॉटेलच्या बाहेर पडले त्यानंतर ते मुंबईत येणार अशी चर्चा सुरू झाली. (Eknath Shinde News)
मात्र आता सूत्रांच्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे हे भाजपच्या नेत्यांची भेट घेण्यासाठी दिल्लीच्या रवाना होणार आहे. दुसरीकडे भाजपचे नेते या सर्व प्रकरणावर कुठलीही प्रतिक्रिया देत नसून त्यांनी वेट अॅण्ड वॉच अशी भूमिका घेतल्याचं दिसून येत आहे. आता एकनाथ शिंदे हे दिल्लीत गेल्यानंतर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत नेमकी काय चर्चा करतात. शिवसेनेचा गट घेऊन भाजपसोबत जात सत्ता स्थापनेचा दावा करणार का? हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.