स्वत:चा मुलगा खासदार आहे त्याचं काय ? उद्धव ठाकरेंचा थेट शिंदेंना सवाल

शिंदे तुम्हाला ते वापरतील आणि फेकून देतील. त्यांनी आदित्य ठाकरेंवर आरोप केले. पण स्वत:चा मुलगा खासदार आहे त्याचं काय ? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी बंडखोर एकनाथ शिंदे यांना केला
uddhav Thackeray and eknath shinde
uddhav Thackeray and eknath shindesaam Tv
Published On

सुमित सावंत

मुंबई : बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा फडकविला आहे. त्यामुळे शिवसेनेत ठाकरे आणि शिंदे गटात उभी फूट पडली आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे आक्रमक झाले आहेत.आज शिवसेनेने भवनमध्ये पक्ष पदाधिकाऱ्यांसोबत बैठकांचे आयोजन केलं आहे. या बैठकीत ठाकरे यांनी भाजप आणि बंडखोर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. 'शिंदे तुम्हाला ते वापरतील आणि फेकून देतील. त्यांनी आदित्य ठाकरेंवर आरोप केले. पण स्वत:चा मुलगा खासदार आहे त्याचं काय ? असा सवाल उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांना केला. ( Uddhav Thackeray Latest News In Marathi )

uddhav Thackeray and eknath shinde
जिद्द असेल तर राहा, नाहीतर तुम्हीही सोडून जा; उद्धव ठाकरेंनी सर्वांना स्पष्टच सांगितलं

शिवसेनेत उभी फूट पडल्याने पक्षात ठाकरे आणि शिंदे असे दोन गट निर्माण झाले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत अंतर्गत संघर्ष तीव्र होताना दिसत आहे. शिवसेनेचे तीसहून अधिक आमदारांनी बंडखोरी केल्याने सेनेवर मोठं पक्षसंकट उभ ठाकलं आहे. आमदारांच्या बंडखोरीनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सक्रिय झाले असून आज त्यांनी दृक्श्राव्य माध्यमातून पक्ष पदाधिकाऱ्यांना संबोधित केले. 'मला या सगळ्यांचा वीट आला आहे. आता हीच वीट डोक्यात घालावी लागेल. बाळासाहेब दैवतच आहेत. त्यांनी आदित्य ठाकरेंवर पण आरोप केले. मात्र, स्वतःचा पोरगा खासदार आहे त्याचं काय ? पण माझा पोरगा होता कामा नये. त्याच त्याच गोष्टी बोलत आहेत. सोडून गेलेल्यांनी माझं नाव न वापरता जगून दाखवावं', असं म्हणत त्यांना एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र सोडलं.

uddhav Thackeray and eknath shinde
हे सर्व भाजपनेच केलंय, त्यांची आग्र्याहून सुटका करावीच लागेल : उद्धव ठाकरे

'तुम्हाला अजिबात ब्लॅकमेल करत नाही. माझ्या प्रेमात अडकू नका, माझ्या मोहात प्रेमात अडकू नका. मी लायक नसेल तर सांगा...जसा मी बाळासाहेबांचा पुत्र आहे. तर त्यांचा लाडका अपत्य शिवसेना आहे. केवळ शिवसेना पुढे कशी जाईल याचा विचार करून निर्णय घ्या, असेही उद्धव ठाकरेंनी सांगितले.

दरम्यान, यावेळी शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनीही मार्गदर्शन केले. 'कोणत्या पक्षात आधी विलीन होणार आहात ते ठरवा , मग बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जाणार हे बोला', असे नीलम गोऱ्हे या एकनाथ शिंदे यांना उद्देशून पदाधिकाऱ्यांना बैठकीत संबोधताना म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com