Cm Eknath Shinde  Saam Tv
मुंबई/पुणे

Maratha Reservation: सरकार ॲक्शन मोडवर; CM शिंदे जिल्हाधिकारी-पोलीस अधीक्षकांची घेणार बैठक; काही जिल्ह्यांमध्ये संचारबंदी होणार लागू?

Maratha Reservation: मुख्यमंत्री राज्यातील जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांची बैठक घेणार आहेत. तसेच काही जिल्ह्यांमध्ये संचारबंदी होणार लागू होण्याची शक्यता आहे.

Vishal Gangurde

Eknath Shinde News:

मराठा आरक्षणावरून राज्यातील काही भागात मराठा आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यात आंदोलकांकडून जाळपोळीच्या घटना देखील घडल्या आहेत. बीडमधील काही राजकीय नेत्यांचे कार्यालय-घरे जाळल्याच्याही घटना घडल्या आहेत. यामुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री राज्यातील जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांची बैठक घेणार आहेत. तसेच काही जिल्ह्यांमध्ये संचारबंदी होणार लागू होण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)

मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांची व्हिडिओ कॉन्फरेन्सद्वारे बैठक घेणार आहेत. या बैठकीत मराठा आंदोलन, सद्य स्तिथी व कायदा व सुव्यवस्था याचा आढावा घेणार आहेत. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील काही जिल्ह्यात संचारबंदी आणि जमाव बंदी लागू होण्याची शक्यता आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तत्पूर्वी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सोमवारी संध्याकाळी राजभवनात राज्यपाल रमेश भैस यांची भेट घेतली. मुख्यमंत्री आणि राज्यपाल ही बैठक जवळपास अर्धा तास चालली. मराठा आरक्षणाबाबत आज मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यपालांची भेट घेतली.

या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीची राज्यपालांना माहिती दिली. मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यभरातील बिघडत चाललेल्या कायदा आणि सुव्यवस्थेबाबतही चर्चा केल्याची माहिती मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Royal Palaces Travel: भारतात आहेत 'हे' ऐतिहासिक राजवाडे, एकदा आवर्जून भेट द्या

Maharashtra Live News Update: यशोमती ठाकूर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर टीका

रोहित आर्य प्रकरणी मोठी अपडेट, माजी शिक्षण मंत्री दीपक केसरकरांची होणार चौकशी, VIDEO

रथोत्सवाला आई-वडिलांना घेऊन गावी आला; घरामागे उभा असताना बंदुकीच्या गोळीनं घेतला वेध, थेट छातीत घुसली!

Kurkuri Bhendi: मुलांच्या डब्ब्यासाठी झटपट बनवा कुरकुरी भेंडी, सिंपल रेसिपी करा फॉलो

SCROLL FOR NEXT