uddhav Thackeray And eknath Shinde
uddhav Thackeray And eknath Shinde saam tv
मुंबई/पुणे

Maharastra Politics : शिंदे गट उद्धव ठाकरेंना मोठा धक्का देण्याच्या तयारीत

साम टिव्ही ब्युरो

मानखुर्द : एकीकडे काल शिंदे गटाचे (Eknath Shinde) आमदार सदा सर्वणकर यांनी दादर मध्ये शिंदे गटाचे सेना भवन आणि ठिकठिकाणी शाखा देखील उभ्या करण्याचे वक्तव्य केले होते. तर आज मानखुर्द मध्ये शिंदे गटाची पहिली शाखाच उभी करण्यात आली आहे. दरम्यान, शिंदे गट आता महाराष्ट्रभरात शाखांची उभारणी करून उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत आहे. (CM Eknath Shinde Latest News)

दादरमध्ये नवीन शिवसेना भवनाच्या घोषणेनंतर शनिवारी मानखुर्द येथे शिंदे गटाच्या नवीन शाखेचे उदघाटन खासदार राहुल शेवाळे यांच्या हस्ते करण्यात आले. मुंबई आणि महाराष्ट्रातील शिंदे गटाची ही फिलिबशाखा आहे. मानखुर्दच्या महाराष्ट्र नगर मध्ये एकीकडे स्टेशन लगत शिवसेनेची १४३ वि शाखा आहे.

खासदार राहुल शेवाळे यांच्या वतीने महाराष्ट्र नगर मध्ये ही पहिली शाखा उभी राहिली आहे. विशेष म्हणजे या शाखेवर फक्त बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे, एकनाथ शिंदे, राहुल शेवाळे आणि नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचे फोटो आहेत. तर उद्धव ठाकरेंचा फोटो मात्र गायब आहे. (CM Eknath Shinde vs Uddhav Thackeray)

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसणार?

दरम्यान, शिंदे गटाचे कार्यालय उभारणीला आता वेग येत असून मुंबईपाठोपाठ पुणे, औरंगाबाद आणि ठाण्यामध्ये शिवसेना कार्यालय थाटण्यात येणार आहे पुण्यातही शिवसेना भवन उभारण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. तर मराठवाड्यातील औरंगाबाद येथेही हे भवन उभारले जाणार आहे. आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांचा पार्श्वभूमीवर शिंदे गटाने आता कंबर कसल्याचं दिसून येत आहे.

पुण्यात तर शहराच्या मध्यवर्ती भागात बालगंधर्व चौकात सेना भवन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी शिंदेगटाचे शहरप्रमुख प्रमोद भानगिरे, आणि सहसंपर्क प्रमुख अजय भोसले यांनी नव्या कार्यलयाची पाहणी केली. तर ठाणे आणि दादरमध्येही कार्यालय होणार असल्याचे गुलाबराव पाटील यांनी सांगितले आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RCB vs CSK IPL 2024 : बेंगळुरूची प्लेऑफमध्ये एन्ट्री पक्की; चेन्नई आयपीएलमधून बाहेर

Indian Politics 2024 : भाजप झाला मोठा संघ झाला छोटा;'आधी RSS ची गरज, आता भाजप सक्षम'

Crime News: युट्यूब पाहून छापल्या लाखोंच्या बनावट नोटा; 9 वी पास तरुणाचा कारनामा

Maharashtra Politics: 'नावं द्या त्या पोलिसांना बघतो मी', उद्धव ठाकरेंनी भरला पोलिसांना दम; मुलुंडच्या राड्यावरून ठाकरेंचा संताप

Kalyan Crime News : यूपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीवर ज्वलनशील पदार्थ लुटलं, कल्याणमधील घटनेने खळबळ

SCROLL FOR NEXT