सरकारी नोकरीसाठी तरुणींना एखाद्यासोबत झोपावं लागतं; कॉंग्रेस आमदाराचं वादग्रस्त विधान

कर्नाटकचे कॉग्रेस आमदार प्रियांक खडगे यांनी वादग्रस्त विधान केलं.
Mla Priyank kharge News
Mla Priyank kharge NewsSaam TV
Published On

कर्नाटक : एकीकडे सध्या देशात बेरोजगारीचं प्रमाण वाढलं असतानाच, कॉंग्रेस (Congress) आमदाराने एक धक्कादायक आणि वादग्रस्त विधान केलंय. तरुणांना सरकारी नोकरी मिळवायची असेल तर त्यांना लाच द्यावी लागते. आणि तरुणींना (Women) सरकारी नोकरीसाठी एखाद्यासोबत झोपावं लागतं, असं धक्कादायक विधान कर्नाटकचे कॉग्रेस आमदार प्रियांक खडगे यांनी केलं. (Congress Mla Priyank kharge Latest News)

Mla Priyank kharge News
Sanjay Rathod : जो कुणी माझी बदनामी करेल त्याला..., मंत्री बनताच राठोडांनी दिला इशारा

कर्नाटकच्या भाजप सरकारवर टीकास्त्र सोडताना त्यांनी हे विधान केलंय. त्यांच्या या विधानाने सर्वत्र संताप व्यक्त केला जात असून मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त प्रियांक खर्गे यांनी कर्नाटक सरकारवर गंभीर आरोप केले.

राज्यात अनेक सरकारी पदभरतीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून राज्यातील भाजप सरकारनं पदांना विकण्याचा निर्णय घेतला आहे, याशिवाय राज्यात एका मंत्र्यांनं तरुणीला नोकरी देण्यासाठी शरीरसुखाची मागणी केल्याचाही धक्कादायक आरोप खर्गे यांनी केला आहे. (Priyank kharge Latest News)

Mla Priyank kharge News
Maharashtra Politics : ...तर शिंदे शहीदच झाले असते; दीपक केसरकर काय म्हणाले? वाचा...

कर्नाटकात गाजत असलेल्या भरती घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी करताना प्रियांक खर्गे म्हणाले की, राज्यात तरुणांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी लाच द्यावी लागते. तर तरुणींना एखाद्यासोबत झोपावं लागतं, त्यामुळं राज्य सरकारनं भरती घोटाळ्याचा तपास SIT मार्फत करायला हवा आणि त्यासंदर्भातील सर्व खटले फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावे.

कर्नाटक सरकारवर टीका करताना खर्गे म्हणाले की, राज्य सरकारने सरकारी नोकऱ्या विकण्याचा निर्णय घेतला आहे. एका मंत्र्याने नोकरीसाठी तरुणीला आपल्यासोबत शय्या करण्यास सांगितले होते. घोटाळा उघड झाल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला. हे मी पुराव्यासह सिद्ध करू शकतो असे त्यांनी म्हटले आहे. आमदार प्रियांक खडगे यांच्या या वक्तव्याने चांगलीच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com