eknath shinde News
eknath shinde News  Saam TV
मुंबई/पुणे

Eknath Shinde : 'धर्मवीर'वरून राष्ट्रवादीमध्ये शरद पवार गट आणि अजित पवार गट; मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर

साम टिव्ही ब्युरो

Eknath Shinde News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात छत्रपती संभाजीराजे यांच्याबाबत विधान केलं होतं. त्यानंतर आज, बुधवारी अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण केलं. अजित पवार यांच्या पत्रकार परिषदेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. (Latest Marathi News)

बाळासाहेबांची शिवसेना आणि पिपल्स रिपब्लिकन पार्टीच्या आघाडीची घोषणा आज, बुधवारी जोगेंद्र कवाडे यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत केली. या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी अजित पवार यांनी आगामी धर्मवीर २ सिनेमावर केलेल्या वक्तव्यावर भाष्य केलं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, 'धर्मवीर २ म्हणजे त्यांच्या पक्षात देखील २ गट झाले आहेत. अजित पवार आणि शरद पवार गट असे दोन गट झाले आहेत. अजित पवार यांच्या सारख्या व्यक्तीने केलेलं भाष्य न शोभणारं आहे. सर्व निंदा करत आहेत'.

पीपल्स रिपब्लिकन पार्टी-शिंदे गटाच्या आघाडीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, जोगेंद्र कवाडे यांच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाने बाळासाहेबांची शिवसेना पक्षासोबत आघाडी केली आहे. सरकार बदलल्यानंतर अनेकांनी युतीचा विषय मांडला आहे. जोगेंद्र कवाडे यांचा पक्ष संघर्षातून पुढे आला आहे आणि आमचा पक्षही संघर्षातून पुढे आला आहे. दोन्ही पक्षांचा संघर्ष साधा नव्हता'.

अजित पवार धर्मवीर सिनेमाबाबत काय म्हणाले होते?

'स्वराज्य रक्षक ही उपाधी सर्वसमावेशक आहे. काही जण संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणतात, काही जन स्वतः धर्मवीर लावतात. काहींचे चित्रपट निघाले, भाग दोन पण येणार आहे, असा टोलाही अजित पवारांनी लगावला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sambhajinagar News : शैक्षणिक वर्ष आटोपले तरीही शिष्यवृत्ती अर्जाचा तिढा कायम; १० हजार विद्यार्थ्यांचे अर्ज प्रलंबित

Buldhana DJ Banned News : बुलढाणा जिल्ह्यात DJ वाजवण्यास बंदी, 22 डीजेवर पोलिसांकडून कारवाई

वर्ल्डकप संघात स्थान मिळताच स्टार खेळाडूची सुपरफ्लॉप कामगिरी!ठरला राजस्थानच्या पराभवाचं कारण

Vastu Tips: कामाच्या टेबलवर ठेवू नका या वस्तू, नकारात्मकता वाढेल

Today's Marathi News Live : PM मोदींप्रमाणे एकही सुट्टी न घेता काम करतोय - CM एकनाथ शिंदे

SCROLL FOR NEXT