Eknath shinde and uddhav thackeray
Eknath shinde and uddhav thackeray  saam tv
मुंबई/पुणे

CM शिंदे हे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का देण्याच्या तयारीत ? ५ आमदारांवर सोपवली विशेष जबाबदारी

Vishal Gangurde

मुंबई : शिंदे गटांच्या बंडाळीमुळे शिवसेनेत मोठी फूट पडली आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या ३९ आमदारांनी बंडखोरी केली. त्यानंतर शिंदे यांनी भाजपसोबत युती करत मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. त्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली असणारे महाविकास आघाडीचे राज्यातील सरकार कोसळले. एकनाथ शिंदे यांनी आमदारानंतर शिवसेनेचे १२ खासदार देखील फोडले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे यांना नव्याने मोठा धक्का देण्यासाठी नवी रणनीती आखली आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांनी आता आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील माजी नगरसेवक फोडण्यासाठी नवा प्लॅन तयार केला आहे. याची विशेष जबाबदारी त्यांनी शिंदे गटाच्या मुंबईतील बंडखोर आमदारांवर सोपवली आहे,अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे मुंबईतील किती माजी नगरसेवक शिंदे गटाच्या गळाला लागणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. (Eknath shinde News In Marathi )

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी नगरसेवक फोडण्याची विशेष जबाबदारी मुंबईतील बंडखोर आमदारांवर सोपवली आहे. प्रकाश सुर्वे, मंगेश कुडाळकर, यामिनी जाधव, दिलीप लांडे आणि सदा सरवणकर यांच्यावर सोपवली आहे. या पाच आमदारांवर माजी नगरसेवक फोडण्यासाठी 'ऑपरेशन मुंबई'ची जबाबदारी देण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तर नुकतेच खासदार राहुल शेवाळे हे शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यांनी मुंबई महापालिकेत २०१० ते २०१४ अशी सलग चार वर्षे स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषविले आहे. त्यामुळे मुंबईत शेवाळे यांचा मुंबईत दांडगा जनसंपर्क आहे. त्यांच्या माध्यमातून देखील मुंबईतील माजी नगरसेवक फोडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर मुंबईतील बंडखोर आमदारांकडून मुंबईत ४५ ते ५० माजी नगरसेवक फोडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे शिवसेनेला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे.

दरम्यान, देशातील सर्वात श्रीमंत असलेली मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपने देखील जय्यत केल्याचे समजते. दुसरीकडे शिवसेनेत मोठी बंडखोरी झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी देखील पदाधिकाऱ्यांसोबत बैठकांचा सपाटा लावला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे देखील अॅक्शनमोडमध्ये आहेत. तर आदित्य ठाकरे हे देखील मुंबईतील सेनेच्या शाखेत जाऊन पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत आहेत. तसेच बंडखोर आमदारांवर जोरदार हल्लाबोल करत आहेत. यामुळे मुंबईत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या नव्या रणनीतीमुळे मुंबईत शिवसेनेचे किती माजी नगरसेवक शिंदे गटाच्या गळाला लागणार, याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbra News : मुंब्रा परिसरात एनसीबीची मोठी कारवाई; आंतरराज्य अमली पदार्थ तस्करीला पर्दाफाश

Mumbai Jobs | मराठी माणसाविषयीची ती पोस्ट, कंपनीने मागितली माफी!

Today's Marathi News Live : प्रचाराच्या शेवटच्या दिवशी इचलकरंजीत प्रचंड तणाव

Jayant Patil On Election Campaign | सभांना गर्दी कशी होते? जयंत पाटील काय म्हणाले?

Palak Tiwari: श्वेताच्या लेकीचं ट्रेडिशनल सौंदर्य; चाहते घायाळ!

SCROLL FOR NEXT