रश्मी पुराणिक
मुंबई: राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू (Meets Draupadi Murmu) यांचा विजय झाला आहे. भारताच्या नव्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू विराजमान झाल्या आहेत. मात्र या सगळ्या विजयोत्सवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या दाव्याचा पराभव झाला आहे. राष्ट्रपती पदासाठी रेकॉर्डब्रेक मतदान होईल आणि महाराष्ट्रातून २०० आमदार मुर्मू यांनी मतं करतील असा दावा मुख्यंमंत्री एकनाथ शिंदेंनी केला होता, मात्र प्रत्यक्षात द्रौपदी मुर्मू यांना महाराष्ट्रातून १८१ मतं मिळाली आहेत, त्यामुळे मुख्यमंत्र्यांच मिशन २०० फेल गेला आहे. (CM Eknath Shinde Mission 200)
हे देखील पाहा -
राष्ट्रपती निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांना राज्यातील दोनशे आमदार मतदान करतील असा निर्धार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला होता. भाजप नेते आशिष शेलार यांनीदेखील याला दुजोरा दिला होता. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आपला करिष्मा दाखवता आला नाही आणि एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना राज्यातील १८१ आमदारांनी मतदान केले, बाकीच्या ९८ आमदारांनी यूपीएचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना मतदान केले.
विश्वासदर्शक ठरावच्या वेळी शिंदे सरकार १६४ ला मतं होती तर विरोधकांना ९९ मतं होती. यात भाजपचे ११३ तर, शिंदे गटाचे ५२ आमदार तसेच उद्धव ठाकरेंसोबतचे १५ आमदार असे मिळून १८० आमदारांचा पाठिंबा NDA च्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना होता. आजच्या मतमोजणीत महाराष्ट्रातून द्रौपदी मुर्मू यांना १८१ मतं मिळाली. म्हणजे मिशन २०० साठी अधिकची २० मतं मिळवण्यात मुख्यमंत्री शिंदे हे अपयशी ठरले.
याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, द्रौपदी मुर्मु यांचा दणदणीत विजय झाला आहे. द्रोपदी मुर्मू यांना ५ लाख ५५ हजार मतं मिळाली आहेत. यशवंत सिन्हा यांना २ लाख ६२ हजार मत मिळाली आहेत. त्यांच्या दुप्पट मतं द्रौपदी यांना मत मिळाली आहेत. द्रौपदी मुर्मू यांचे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून अभिनंदन करतो. आता आदिवासी समाजाचा विकास होईल त्यांची प्रगती होईल. आदिवासी भागातील द्रौपदी मुर्मू यांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी उमेदवारी दिली म्हणून त्यांचेदेखील आभार मानतो. मिशन २०० नाही पूर्ण झाले पण, अधिक मत महाराष्ट्रातून मिळाली ही पुरेशी नाहीत का? असं यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत.
दरम्यान आदिवासी समाजातील पहिल्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांची निवड झाल्याने ओडीसासह संपूर्ण देशभरात जल्लोष केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी द्रौपदी मुर्मू यांची भेट घेत त्यांचे अभिनंदन केले आहे. दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी ही भेट घेण्यात आली, यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हे देखील उपस्थित होते. मोदींनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले. (Draupadi Murmu Latest News)
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.