PM Modi Meets Draupadi Murmu
PM Modi Meets Draupadi MurmuTwitter/@ANI

पंतप्रधान नवनिर्वाचीत राष्ट्रपतींच्या भेटीला; द्रौपदी मुर्मू यांच्या निवासस्थानी भेट घेत दिल्या शुभेच्छा

PM Modi Meets Draupadi Murmu : भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत मुर्मू यांच्या विजयाचा जल्लोष केला आहे.

नवी दिल्ली : राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू (Meets Draupadi Murmu) यांचा विजय झाला आहे. भारताच्या नव्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू विराजमान झाल्या आहेत. आदिवासी समाजातील पहिल्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांची निवड झाल्याने ओडीसासह संपूर्ण देशभरात जल्लोष केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी द्रौपदी मुर्मू यांची भेट घेत त्यांचे अभिनंदन केले आहे. दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी ही भेट घेण्यात आली, यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हे देखील उपस्थित होते. मोदींनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले. (Draupadi Murmu Latest News)

हे देखील पाहा -

भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत मुर्मू यांच्या विजयाचा जल्लोष केला आहे. आज राष्ट्रपतिपदासाठीच्या निवडणुकीची मतमोजणी पार पडली. मतमोजणी दरम्यान मुर्मू आघाडीवर असल्याने त्यांचा विजय निश्तित मानला जात होता. मुर्मू यांच्या विरुद्ध विरोधी पक्षांचे संयुक्त उमेदवार यशवंत सिन्हा निवडणुकीत उतरले होते. द्रौपदी मुर्मू यांना ५४० हून अधिक मतं मिळाली आहेत. तर विरोधी पक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना २०४ मतं मिळाली आहेत. भाजपने द्रौपदी मुर्मू यांची उमेदवारी जाहीर केल्यापासूनच त्यांची चर्चा देशभर सुरू होती.

द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) या देशातील पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती आहेत. २०१५-२०२१ दरम्यान त्या झारखंडच्या राज्यपाल होत्या. २० जून १९५८ रोजी जन्मलेल्या मुर्मू यांचे शालेय शिक्षण भुवनेश्वरच्या रमादेवी महिला महाविद्यालयातून झाले. त्या पदवीधर आहेत. त्यांचे पती श्याम चरण मुर्मू यांचा मृत्यू झाला आहे. त्यांना एक मुलगी आहे. इतिश्री मुर्मू असे तिचे नाव आहे. इतिश्रीचे लग्न झाले आहे.

द्रौपदी मुर्मू या २०१३ ते २०१५ पर्यंत भाजपच्या एस.टी मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या सदस्य होत्या. २०१० मध्ये त्यांनी मयूरभंज येथून भाजपच्या जिल्हाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. त्यांना २००७ मध्ये सर्वोत्कृष्ट आमदाराचा 'नीळकंठ पुरस्कार' मिळाला आहे.२००६-२००९ दरम्यान त्या भाजपच्या एस.टी मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा होत्या. २००४-२००९ दरम्यान, द्रौपदी मुर्मू रायरंगपूर, ओडिशा येथून आमदार झाल्या.

PM Modi Meets Draupadi Murmu
Forbes Billionaires: बिल गेट्सला मागे टाकत गौतम अदानी बनले जगातील चौथे श्रीमंत व्यक्ती

२००२-२००९ दरम्यान, मुर्मू यांनी भाजपचे (BJP) राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य म्हणून एस.टी. आघाडीची जबाबदारी घेतली. २०००-२००४ दरम्यान त्या ओडिशा सरकारमध्ये परिवहन आणि वाणिज्य खात्याच्या मंत्री होत्या. २००२-२००४ दरम्यान त्यांनी ओडिशा सरकारच्या पशुसंवर्धन विभागाची जबाबदारी सांभाळली आहे. १९९७ मध्ये त्या नगरसेवक झाल्या आणि रायरंगपूरच्या उपाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झाली. द्रौपदी मुर्मू या देशाच्या १५ व्या राष्ट्रपती तर देशाच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती बनल्या आहेत.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com