Eknath Shinde Group
Eknath Shinde Group Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : मुख्यमंत्री शिंदेंनी टोचले आमदारांचे कान; 'सह्याद्री'वरील बैठकीत काय सूचना दिल्या? पाहा VIDEO

Satish Daud

लोकसभा निवडणुकीत आत्मविश्वास वाढल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाने ऐन मोक्याच्या क्षणी मोठा डाव टाकला. उद्धव ठाकरे यांनी मिलिंद नार्वेकर यांना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर करत महाविकास आघाडीचा तिसरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवला. त्यामुळे आता विधानपरिषद निवडणूक अटळ असून ११ जागांसाठी १४ उमेदवारांमध्ये चुरशीची लढत होणार आहे.

हीच बाब लक्षात घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या निवडणुकीकडे विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथी गृहावर मंगळवारी (ता. २ जुलै) रात्री आपल्या पक्षातील आमदारांची बैठक बोलावली होती.

या बैठकीत त्यांनी आमदारांना काही महत्वाच्या सूचना केल्या. निवडणुकीत कुठल्याही परिस्थितीत महायुतीच्या सर्व ९ जागा निवडून आणायच्या आहेत. त्यासाठी तयारीला लागा, आपआपल्यात मतभेद होऊ देऊ नका, असं सांगत मुख्यमंत्री शिंदे यांनी आमदारांचे चांगलेच कान टोचले.

त्याचसोबत विधानसभा निवडणुकीसाठीही आतापासूनच तयारी करा. आपआपल्या मतदारसंघातील लोकांसोबत संपर्क साधा. त्यांच्यापर्यंत सरकारने आणलेल्या योजना पोहचवा. लाडकी बहीण यासारख्या शासन योजनांची त्यांना माहिती द्या, अशा सूचनाही शिंदे यांनी आपल्या पक्षातील आमदारांना केल्या आहेत.

विधानपरिषदेची निवडणूक चुरशीची होणार

विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी बिनविरोध निवडणूक व्हायला हवी, असा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न होता. यासाठी त्यांनी विरोधी पक्षातील काही नेत्यांसोबत संपर्कही साधला होता. मात्र, उद्धव ठाकरे यांनी ऐन मोक्याच्या क्षणी मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी जाहीर करत महाविकास आघाडीचा तिसरा उमेदवार निवडणुकीच्या रिगणात उतवरला. त्यामुळे आता निवडणूक अटळ आहे.

विधान परिषद निवडणुकीतील ११ जागांसाठी महायुतीचे ९ आणि महाविकास आघाडीचे ३ उमेदवार असे एकूण १२ उमेदवार रिंगणात आहे. विधानसभेतील आमदारांचे सध्याचे संख्याबळ पाहता महायुतीचे सर्वच्या सर्व उमेदवार विधानपरिषद निवडणुकीत निवडून येऊ शकतात. दुसरीकडे महाविकास आघाडीचे फक्त २ उमेदवारच निवडून येऊ शकतात.

मात्र मागील काही दिवसांपासून शिंदे गटातील काही आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा ठाकरे गटाचे नेते करीत आहेत. असाच दावा अजित पवार यांच्या पक्षातील आमदारांबाबत शरद पवार यांच्या पक्षातील नेत्यांचा देखील आहे. विधानपरिषद निवडणुकीत तिसरा उमेदवार निवडून येण्यासाठी महाविकास आघाडीला ५ ते ६ आमदारांची गरज आहे. त्यामुळे महायुतीचे आमदार फुटणार का? असा प्रश्न अनेकांना पडलाय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Live News Updates : 'मुंबई शहराला हवामान बदलाचा फटका', उपमुख्यमंत्री अजित पवार

Munisha Khatwani Eliminated : बिग बॉसच्या घरातून मुनिषा खटवानी नॉमिनेट, बिग बॉसने अरमान मलिकला सुनावली मोठी शिक्षा

Viral Video : किंकाळ्या, आरडाओरडा आणि कामावर पोहचण्याची धडपड; ठाणे स्थानकातील जीवघेण्या गर्दीचा VIDEO व्हायरल

Mumbai Rain VIDEO: वेस्टर्न एक्सप्रेसवेवर वाहतुक कोंडी, मुसळधार पावसाचा मुंबईतील वाहतुकीला फटका

Pune Hit And Run: हरवलेल्या मुलीला शोधून आई-बाबांकडे सोपवलं; पण घरी जाण्याआधीच पोलीस कर्मचाऱ्याला मृत्यूने गाठलं

SCROLL FOR NEXT