CM Eknath Shinde Not pick up phone of Ajit Pawar Saam Tv
मुंबई/पुणे

Ajit Pawar: अजित पवारांचा फोन मुख्यमंत्र्यांनी उचलला नाही, काय आहे कारण?

CM Eknath Shinde Not pick up phone of Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठक सुरु असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन केला होता. मात्र अजित पवारांचा फोन मुख्यमंत्री शिंदे यांनी उचलला नाही.

Satish Kengar

एक मोठी राजकीय बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठक सुरु असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन केला होता. मात्र अजित पवारांचा फोन मुख्यमंत्री शिंदे यांनी उचलला नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतून अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन केला होता. खासदारांच्या प्रश्नासाठी अजित पवार यांनी फोन केला होता, असं सांगण्यात येत आहे. या बैठकीचा व्हिडिओही समोर आला आहे. ज्यात अजित पवार मुख्यमंत्री शिंदे यांना फोन करत असल्याचं दिसत आहे. या बैठकीला शरद पवार हे देखील उपस्थित होते.

'बारामती, शिरूरला निधी दिला जात नाही', सुप्रिया सुळे, कोल्हेंची अजित पवार यांच्याकडे तक्रार

दरम्यान, बारामती आणि शिरुरला निधी दिला जात नसल्याची नाराजी सुप्रिया सुळेंनी पुणे जिल्हा नियोजन बैठकीत व्यक्त केलीय. मावळला निधी दिला जातो तोच न्याय बारामती आणि शिरुरला देण्याची मागणी सुळेंनी अजित पवारांकडे केलीय. मात्र आचारसंहिता असल्यामुळे निधी देता आला नाही असं उत्तर अजित पवारांनी दिलं.

तर दुसरीकडे अजित पवारांचे आमदार सुनील शेळके मात्र बैठकीत आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालंय. बैठकीत सुप्रिया सुळे आणि सुनील शेळकेंमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळालंय. आमच्या मतदारसंघात जास्त निधी मिळतो तर तुम्ही नाराज होण्याचं कारण काय असा सवाल शेळकेंनी विचारलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

2025 Horoscope: नव्या वर्षात शुक्रामुळे तयार होणार मालव्य राजयोग; 'या' राशींची होणार भरभराट

Maharashtra Politics : पवार-ठाकरेंच्या सूचनेवरुन मनोज जरांगेशी संवाद, त्यानंतर माघार; असिम सरोदेंचा मोठा गौप्यस्फोट

Winter Season: हिवाळ्यात मध खाण्याचे 'हे' आहेत जबरदस्त फायदे

Success Story: लंडनमधील कोट्यवधींची नोकरी सोडली, पहिल्याच प्रयत्नात UPSC क्रॅक; IAS ऑफिसर दिव्या मित्तल यांची यशोगाथा

Viral Video: बाईक की टेम्पो! दुचाकीवरून ८ जणांचा प्रवास, पोलिसांनी जोडले हात, व्हिडीओ पाहून हैराण व्हाल!

SCROLL FOR NEXT