'आमचं सरकार आल्यानंतर धारावी टेंडर रद्द करू आणि धारावीकरांच्या हिताचे टेंडर आणू.' असे वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले होते. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या या वक्तव्याला भाजपच्या नेत्याने प्रत्युत्तर दिले आहे. भाजपचे नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. 'विकासाचे प्रकल्प रद्द करणं हीच उद्धव ठाकरेंची ओळख आहे.', असे म्हणत भातखळकर यांनी उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले.
अतुल भातखळकर यांनी सांगितले की, 'आमचं सरकार आल्यानंतर धारावी पुनर्वसन प्रकल्प रद्द करू या उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावर आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. सर्व विकासाचे प्रकल्प रद्द करणं आणि त्याला रद्द करणं हीच उद्धव ठाकरेंची खासियत आहे. समृद्धी महामार्ग असेल, धारावीचा पुर्वसन प्रकल्प असेल, मेट्रोचा प्रोजेक्ट असेल तसंच नाणार आणि बारसूची रिफायनरी असेल. जिथे जिथे लोकांचे आणि विशेषत: मराठी माणसांचं भलं होतंय तिथे उद्धव ठाकरे यांच्या पोटात दुखतं.'
तसंच, 'उद्धवजी मुंबई शहरातला मूळ मुंबईकर या मुंबईत राहण्याकरता आणि त्याला चांगले जीवनमान देण्याकरता धारावीचा पुनर्वसन प्रकल्प आहे. तुमचा बीडीडी चाळीच्या पुनर्वसनाला विरोध होता तसाच धारावी पुर्वसन प्रकल्पाला विरोध आहे. मुंबईकर मुंबईच्या बाहेर पाठवायचे आणि आपल्या बिल्डर मित्रांच्या घशात मुंबई घालवायची हे तुमचे कुटीत कारस्थान आहे. या धारावी पुनर्वसन प्रकल्पासाठी रेल्वेने आपली जागा दिली. त्यामुळे धारावीचा पुनर्वसन प्रकल्प होईल. कारण मुळ मुंबईकर या मुंबईत राहून चांगल्या स्थितीत जगेल. त्यामुळे हा प्रकल्प पूर्णत्वाला जाणार हे नक्की आहे.', असे म्हणत अतुल भातखळकर यांनी धारावी पुनर्वसन प्रकल्प होणारच असे ठाम मत व्यक्त केले.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत धारावी प्रकल्पाला विरोध करत सरकारवर टीका केली. धारावी अदानीच्या घशात घालण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करत उद्धव ठाकरे यांनी केला. 'सरकार कॉन्ट्रॅक्ट मित्राचं चांगभलं करत आहेत. मोदी आणि शहांनी गुजरातला मुंबईची गिफ्ट सिटी पळवून नेली. आता उद्या ते मुंबईचे नाव बदलून अदानी सिटी करतील. पण आम्ही ते होऊन देणार नाही. मुंबईला लुटून भिकेला लावायचे काम याचे सुरू आहे पण ते आम्ही करून देणार नाही. अदानींना धारावी देण्याचा यांचा डाव उधळून लावू.', असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.