Maharashtra Politics : भाजपचा बडा नेता शरद पवारांच्या गळाला; माजी मंत्री आज 'तुतारी' फुंकणार; नांदेडपर्यंत आवाज घुमणार

Maharashtra Political News : विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला मराठवाड्यात आणखी एक मोठा धक्का बसणार आहे. नांदेड जिल्ह्यातील माजी मंत्री डॉ. माधवराव किन्हाळकर आज शेकडो कार्यकर्त्यांसह शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार आहेत.
Sharad Pawar, Eknath Shinde, Devendra Fadnavis
Sharad Pawar, Eknath Shinde, Devendra FadnavisSaam Tv
Published On

विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला मराठवाड्यात आणखी एक मोठा धक्का बसणार आहे. नांदेड जिल्ह्यातील माजी मंत्री डॉ. माधवराव किन्हाळकर आज शेकडो कार्यकर्त्यांसह शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार आहेत. शरद पवार यांच्या उपस्थितीत पिंपरी-चिंचवड येथे सायंकाळी ४ वाजता हा प्रवेश सोहळा पार पडणार आहे. माधवराव किन्हाळकर यांचा नांदेडमध्ये तगडा जनसंपर्क आहे.

Sharad Pawar, Eknath Shinde, Devendra Fadnavis
Uddhav Thackeray: मुंबईला अदानी सिटी बनवण्याचा डाव, धारावी प्रकल्पावरून उद्धव ठाकरेंचे सरकारवर टिकास्त्र

त्यांनी पक्षात प्रवेश केल्यानंतर शरद पवार यांची ताकद आणखीच वाढणार आहे. काही दिवसांपूर्वी किन्हाळकर यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली होती. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. ते लवकरच शरद पवार गटात प्रवेश करणार अशा चर्चा रंगल्या होत्या.

आज या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. आपण शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याचं माधवराव किन्हाळकर यांनी स्पष्ट केलं आहे. विशेष बाब म्हणजे, काही दिवसांपूर्वी माजी केंद्रीय मंत्री सुर्यकांता पाटील यांनी भाजपाचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता.

त्यानंतर डॉ. माधवराव किन्हाळकर यांनी देखील भाजपला सोडचिठ्ठी दिली. त्यांच्यापाठोपाठ भाजपाचे उदगीर मतदारसंघाचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांनीही भाजपला रामराम ठोकला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी मराठवाड्यात भाजपला खिंडार पडलं असून महाविकास आघाडीची चांगलीच ताकद वाढली आहे.

कोण आहेत माधवराव पाटील किन्हाळकर?

माधवराव पाटील किन्हाळकर यांनी १० वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. पण भाजपने त्यांना कोणतीही महत्वाची जबाबदारी दिली नाही. त्यामुळे किन्हाळकर हे नाराज असल्याचे बोलले जात होते. माधवराव पाटील किन्हाळकर आधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते.

त्यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारमध्ये १९९१ ते १९९५ या कालावधीत ते गृह व्यवहार, महसूल आणि सहकार राज्यमंत्रीपद भूषवले होते. मात्र, त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 2014 साली किन्हाळकर यांनी भोकर (विधानसभा मतदारसंघ) मधून अमिता अशोकराव चव्हाण यांच्या विरुद्ध भाजप उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत पराभूत झाले होते.

Sharad Pawar, Eknath Shinde, Devendra Fadnavis
VIDEO: 'मराठ्यांसाठी देह गेला तरी चालेल', अजय महाराज बारसकर आक्रमक, 'सागर' बंगल्यासमोर ठिय्या आंदोलन, नेमकं काय घडतयं?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com