CM Eknath Shinde
CM Eknath Shinde Saam TV
मुंबई/पुणे

संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाचं अमोल कोल्हेंनी केलेलं नामांतर मुख्यमंत्र्यांनी पुन्हा बदललं

सुरज सावंत

मुंबई: धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यातील वढू बुद्रूक येथील समाधीस्थळाच्या नामंतरणाचा विषय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निकाली काढला आहे. वढू बुद्रूक तुळापूर येथील संभाजी राजेंच्या समाधीस्थळाचे खासदार अमोल कोल्हेंनी 'स्वराज्य रक्षक संभाजी' असे नामंतरण केले होते. (Dharmaveer Chhatrapati Sambhaji Maharaj)

'स्वराज्य रक्षक संभाजी' याच नावाची मराठी वाहिनीवर अमोल कोल्हेंची (Amol Kolhe) मालिका प्रसारीत झाली होती. शिवाय स्थानिक गावकऱ्यांनी देखील संभाजी महाराजांच्या स्मारकाला 'स्वराज्य रक्षक संभाजी' नाव द्यायला विरोध केला होता. याच पार्श्वभूमीवर गावकर्यांनी आज मुख्यमंत्री एकनाथी शिंदे यांची भेट घेतली होती.

पाहा व्हिडीओ -

या भेटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी नामांतराचा विषय निकाली काढत तुळापूर येथील छत्रपती संभाजीराजेंच्या समाधीस्थळाचे नाव पुन्हा 'धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज' करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आतापासून या समाधी स्थळाचे नाव हे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज करण्यात आले आहे.

दरम्यान, छत्रपती संभाजीराजेंचे आतंरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारच्या काळात घेण्यात आला होता. शिवाय महाराजांचे स्मारक हे पाहता क्षणी मनाचा ठाव घेणारे असे असावे, असे निर्देश तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pre-Wedding Shoot : उन्हाळ्यात प्री वेडिंग शूट करताना 'ही' काळजी घ्या

Tur Dal Rate Update: तुरडाळ महागली! जाणून घ्या नवे दर

Hardik Pandya Statement: मुंबईच्या पराभवाला हार्दिकने या खेळाडूला ठरवलं कारणीभूत! म्हणाला...

Today's Marathi News Live: माढ्यात आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या तीन सभा

Sharman Joshi Birthday : शर्मन जोशीला ‘इडियट’ नाव कसं मिळालं?; अभिनेत्याच्या करियरला ‘या’ चित्रपटांमुळे मिळाली कलाटणी!

SCROLL FOR NEXT