Vedanta: 'गुवाहाटीतून सरकार आणलं, CM शिंदेंकडून 'वेदांता'च्या रुपात PM मोदींना रिटर्न गिफ्ट'

'गुजरातमध्ये सुविधा नसताना, स्कील रोजगार नसताना तिथे प्रकल्प का गेला? वेदांता प्रकल्प पंतप्रधानांनी पळवला'
Vedanta-Foxconn Eknath Shinde And Narendra Modi
Vedanta-Foxconn Eknath Shinde And Narendra ModiSaam TV
Published On

नागपूर: वेदांता (Vedanta) प्रकरणावरुन विरोधक राज्य सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. शिवसेना राष्ट्रवादीने या मुद्यावरुन शिंदे-फडणवीस सरकारविरोधात आंदोलनाला सुरुवात केली आहे. तर आता काँग्रेसने (Congress) देखील महाराष्ट्रभर आंदोलन करण्याचा इशारा शिंदे सरकारला दिला आहे.

तसंच आपल्याला गुवाहाटीमधून सरकार मिळवून दिलं त्या बदल्यात हा प्रकल्प मोदींना गिफ्ट दिलात का? असा सवाल करत काँग्रेसने एकनाथ शिंदेंवर (Eknath Shinde) टीका केली आहे. काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी आज पत्रकार परिषद घेत सरकारवर निशाणा साधला तसंच वेदांता प्रकल्पावरुन राज्यभरात आंदोलन करण्याचा इशारा देखील दिला.

पाहा व्हिडीओ -

पत्रकार परिषदेत बोलताना लोंढे म्हणाले, 'एखाद्या सरकारने किती खोटं बोलावं, विदर्भाच्या तरुणांवर शिंदे-फडणवीसांनी अन्याय केला आहे. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली १५ जुलैला बैठक झाली होती. १ लाख ५४ हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे.

६० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रात होणार होती. एक लाख लोकांना रोजगार मिळणार होता. वेदांताचे अग्रवाल यांच्यावर काही दबाव आहे का? अशी स्थिती सध्या आहे. कौशल्यधारक रोजगार महाराष्ट्रात आहे, गुजरातमध्ये (Gujarat) सुविधा नसताना, स्कील रोजगार नसताना तिथे प्रकल्प का गेला? वेदांता प्रकल्प पंतप्रधानांनी गुजरातला पळवला असल्याचा आरोप लोंढे यांनी केला.

Vedanta-Foxconn Eknath Shinde And Narendra Modi
वेदांता गुजरातला नक्की कशामुळे गेला? भाजपने सांगितली कारणं, ठाकरे सरकारवरच ढकललं प्रकरण

शिवाय हे असंच सुरु राहिले तर मुंबई गुजरातमध्ये संलग्नित करतील गुवाहाटीतून सरकार मिळवून दिलं, म्हणून हे रिटर्न गिफ्ट आहे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. वेदांता महाराष्ट्रात गुंतवणूक न करणं हा जुमला आहे. शिंदेसाहेब महाराष्ट्राशी गद्दारी कराल तर आम्ही शांत बसणार नाही. काँग्रेस संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करेल असा इशारा लोंढे यांनी राज्य सरकारला दिला.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com