cm eknath shinde assures 61 workers to rejoin annasaheb patil arthik vikas mahamandal says narendra patil  Saam Digital
मुंबई/पुणे

Annasaheb Patil Arthik Vikas Mahamandal : नरेंद्र पाटलांच्या आक्रमकतेमुळे 'त्या' 61 कर्मचा-यांना मिळाला दिलासा, मराठा समाजासाठी मुख्यमंत्र्यांचे निर्देश (पाहा व्हिडिओ)

annasaheb patil arthik vikas mahamandal: सरकार मराठा समाजाला न्याय देण्यासाठी सकारात्मक असताना सरकारला अडचणी आणण्यासाठी व्यवस्थापकीय संचालक कोणाच्या सांगण्यावरून काम करत आहेत याची माहिती घेत व्यवस्थापकीय संचालकांची बदली करण्याची मागणी नरेंद्र पाटील यांनी केली.

Siddharth Latkar

- सिद्धेश म्हात्रे

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातून काढलेल्या 61 कर्मचा-यांना पुन्हा सेवेत घ्या, गरज भासल्यास आणखी कर्मचारी घ्या असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याची माहिती अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दिली. पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीतील चर्चेचा तपशीलही सांगितला.

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामध्ये काम करीत असलेल्या 61 कर्मचा-यांना महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मंगेश मोहिते यांनी कोणतीही चर्चा न करता अचानकपणे कामावरुन कमी केले हाेते. या निर्णयावरुन महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेतला हाेता.

व्यवस्थापकिय संचालक यांनी अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील 90 हजार लाभार्थ्यांना योग्य वेळी व्याज परतावा आणि योग्य ती मदत मिळणार नाही अशी भावना अनेकांनी नरेंद्र पाटील यांच्याकडे व्यक्त केली हाेती. त्यानंतर पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेतला.

नरेंद्र पाटील यांनी वर्षा बंगला येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत 61 कर्मचा-यांना पुन्हा कामावर घ्यावे अशी मागणी केली. या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी कर्मचारी कपातीचा निर्णय रद्द केला. तसेच आवश्यकता भासल्यास अधिकच्या कर्मचा-यांची नेमणुक केली जाईल असे मुख्यमंत्र्यांनी आश्वासित केल्याचे पाटील यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: दिप्तीनंतर आता कीर्ती! बाथरुममध्ये कोंडलं, बेदम मारलं; १०लाखांसाठी अमानुष छळ; आणखी एका विवाहितेनं संपवलं आयुष्य

चंद्रपूरचा महापौर भाजपचा की काँग्रेसचा? महापालिकेची सूत्रं 'मातोश्री'च्या हाती? VIDEO

Special Report : महायुतीत ठणाठणी! शिंदेसेनेचं भाजपच्या नाईकांना ओपन चॅलेंज

व्हॉट्सअॅपसाठी पैसे मोजावे लागणार? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय? VIDEO

Zilla Parishad Election: भाजपनं ठाकरेंचा उमेदवार पळवला? पनवेल तहसील कार्यालयावर शेकापचा राडा, माघार घेण्यावरून रंगला राजकीय ड्रामा

SCROLL FOR NEXT