Coastal Road Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Coastal Road: कोस्टल रोडला 'छत्रपती संभाजी महाराज' यांचं नाव, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची मोठी घोषणा

Mumbai Coastal Road: राज्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले.

साम टिव्ही ब्युरो

Mumbai News: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. मुंबईची लाईफलाईन ठरणाऱ्या सागरी महामार्ग म्हणजेच कोस्टल रोडला 'छत्रपती संभाजी महाराज' यांचे नाव देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. गेटवे ऑफ इंडिया येथे पहिल्यांदाच आयोजित छत्रपती संभाजी महाराज जयंती महोत्सवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली.

राज्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत म्हटलं की, 'मुंबईतील कोस्टल रोडला आपल्या सर्वांचे आदर्श धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी जाहीर केला, त्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार!' (Latest Marathi News)

कसा आहे कोस्टल रोड प्रकल्प?

मुंबई कोस्टल रोड प्रकल्प हा 12,000 कोटींचा प्रकल्प आहे, ज्यात भारताच्या मुंबईच्या पश्चिम किनार्‍यावर 8-लेन, 29.2 किमी लांबीचा किनारी रस्ता असेल. हा प्रकल्प मुंबई महानगरपालिकेने सुरू केला आहे.

मुंबई कोस्टल रोड प्रकल्पामुळे दक्षिण मुंबई आणि पश्चिम उपनगरांमधील प्रवासाचा वेळ 2 तासांवरून 40 मिनिटांपर्यंत कमी करणे अपेक्षित आहे. यामुळे शहरातील सध्याच्या रस्त्यांची वर्दळ कमी होईल आणि मुंबईचा एकंदरीत संपर्क सुधारेल, अशी अपेक्षा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठी'आणि 'मराठी माणसाला' कधीच एकटं पडू देणार नाही, हा शब्द आहे ठाकरेंचा

Jawhar Hidden Temple : निसर्गाच्या सानिध्यात वसलेले देवबांध गणपती मंदिर तुम्हाला माहिती आहे का? अनुभवाल मंत्रमुग्ध वातावरण

Maharashtra Live News Update: यशोमती ठाकूर यांना भाजपची फार काळजी आहे, रवी राणा यांचा निशाणा

Crime: गोव्यात २ रशियन महिलांची हत्या, हात-पाय बांधले; नंतर चाकूने वार करत गळा चिरला

Aadhaar Card on WhatsApp: आता व्हॉट्सअ‍ॅपवरही मिळणार आधार कार्ड, झटपट डाउनलोड करण्याच्या सोप्या स्टेप्स

SCROLL FOR NEXT