Sulochana Latkar News Saam Tv
मुंबई/पुणे

Sulochana Latkar Funeral: 'सुलोचनादीदींचे निधन ही अत्यंत दुःखद', मुख्यमंत्र्यांनी घेतलं पार्थिवाचं अंत्यदर्शन

CM Shinde And Devendra Fadnavis Took Last Darshan of Sulochana Latkar: 'सुलोचनादीदींचे निधन ही अत्यंत दुःखद', मुख्यमंत्र्यांनी घेतलं पार्थिवाचं अंत्यदर्शन

साम टिव्ही ब्युरो

Sulochana Latkar News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रभादेवी येथील निवासस्थानी ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनादीदी लाटकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेवून श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी आमदार सदा सरवणकर, अभिनेते सचिन पिळगावकर व अन्य मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “सुलोचनादीदींचे निधन ही अत्यंत दुःखद, रसिकांच्या मनाला चटका लावणारी घटना आहे. त्यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टी पोरकी झाली आहे. त्या चित्रपटसृष्टीतल्या मूर्तिमंत वात्सल्य होत्या. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनयाने त्यांनी ३०० हून अधिक चित्रपटांमध्ये आपला ठसा उमटवला. विशेषकरून त्यांनी साकारलेली ‘आई’ ची भूमिका ठसा उमटवणारी ठरली.

ते म्हणाले, ''ज्येष्ठ अभिनेते देवानंद, राजेश खन्ना, अमिताभ बच्चन यांच्या सारख्या दिग्गज कलावंतांसोबत त्यांनी चित्रपटांत काम केले. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये मायेची पखरण करणाऱ्या वात्सल्यमूर्ती हरपल्या. त्यांच्या जाण्याने प्रत्येकालाच वाटते की आपल्यातलेच कुणी गेले आहे. इतका प्रेम, जिव्हाळा त्यांनी निर्माण केला आहे.'' (Latest Marathi News)

सुलोचनादीदींची कारकीर्द अनेकांना प्रेरणादायी ठरेल: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आपल्या चित्रपटसृष्टीमध्ये काही नावे अशी आहेत. ज्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे ती अजरामर आहेत. चित्रपटसृष्टीत त्यांच्याबद्दल प्रचंड आदर आहे. यातीलच एक नाव सुलोचनादीदींचे आहे. सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी नायिकेच्या भूमिका साकारल्या. नंतर आईच्या भूमिका साकारल्या, त्या अत्याधिक लोकप्रिय झाल्या. माझ्या पिढीने त्यांना आईच्या रुपात बघितले आहे.

ते पुढे म्हणाले, ''तिशय सोज्वळ आणि ममत्त्व वाटावे असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. सुलोचनादीदींची कारकीर्द अतिशय थक्क करणारी आहे. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. या पुरस्कारांपेक्षाही त्यांचे कार्य मोठे होते. त्यांनी गाजवलेली कारकीर्द अनेकांना प्रेरणादायी ठरेल.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सोलापूर जिल्हा बँकेवर पहिल्यांदाच भाजपची सत्ता; काँग्रेस-राष्ट्रवादीचा दारुण पराभव, विजेत्यांची यादी एका क्लिकवर

Maharashtra News Live Update: सोलापूर जिल्ह्यात एआयडेटा सेंटरच्या विरोधात शेतकऱ्यांचा मशाल मोर्चा

Nauvari Saree Draping: नऊवारी साडी नेसताना गोंधळ होतोय? या ७ सोप्या स्टेप्स फॉलो करुन नेसा परफेक्ट साडी

Gold Price Today : ३ दिवसात सोनं ४००० रुपयांनी महागलं, सुवर्णबाजारात दर वाढ का झाली?

Stress And Diabetes : जास्त टेन्शन घेता? सावधान! होऊ शकतो मधुमेहाचा धोका? जाणून घ्या तज्ज्ञांकडून महत्त्वाची माहिती

SCROLL FOR NEXT