Sanjay Shirsat On Devendra Fadnavis Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: 'फडणवीस यांनी केंद्रात जावं', संजय शिरसाठ यांच्या वक्तव्यानंतर युतीत वादाची ठिणगी?

Sanjay Shirsat On Devendra Fadnavis: 'फडणवीस यांनी केंद्रात जावं', संजय शिरसाठ यांच्या वक्तव्यानंतर युतीत वादाची ठिणगी?

Satish Kengar

Sanjay Shirsat On Devendra Fadnavis:

'देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रात जावं आणि एकनाथ शिंदे यांनाच राज्यात ठेवावं', असं वक्तव्य शिवसेना आमदार संजय शिरसाठ यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर युतीत वादाची ठिणगी पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

शिरसाठ यांच्या या वक्तव्यानंतर भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा आहे. शिरसाठ यांना यासाठी समजही दिली जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरसाठ यांच्या वक्तव्यामुळे महायुतीतील नेते नाराज आहेत. महायुतीच्या समनव्य समितीच्या बैठीकित शिरसाठ यांना याबाबत समज दिली जाण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)

देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जायचं की राज्यात रहायचं हे ते ठरवतील: प्रवीण दरेकर

यावर आता सदोन्ही पक्षाच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया देखील येण्यास सुरुवात झाली आहे. यावर बोलताना भाजप आमदार प्रवीण दरेकर म्हणाले आहेत की, ''देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीला जावं की महाराष्ट्रमध्ये रहावं, हे सुचवण्याचा अधिकार शिरसाठ यांना नाही. त्यांनी आपल्या क्षमतेत बोलावं. देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जायचं की राज्यात रहायचं हे ते ठरवतील.''

ते पुढे म्हणाले की, ''आम्हा कार्यकर्त्यांना देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातच हवेत, अशी आमची इच्छा आहे. राज्यातील जनतेची इच्छा देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रचे नेतृत्व करावे, अशी आहे. राज्यावर आज अनेक संकट आहेत. सरकारने एकत्रितपणे सामोरे जाण्याची आवश्यकता आहे..अशावेळी महायुतीतील वातावरण दूषित होणार नाही, याची काळजी महायुतीच्या नेत्यांनी घेतली पाहिजे.''

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'या' लोकांनी चुकूनही सकाळच्या वेळी चहा पिऊ नये

Maharashtra News Live Updates: एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्री होऊ नये - रामदास आठवले

IPL 2025 Mega Auction: ५७७ पैकी १८२ खेळाडू झाले मालामाल! पाहा सर्व १० संघांची संपूर्ण यादी

Home Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये कोणत्या दिशेला काय असावे? वाचा

IQ Test: 'या' फोटोमध्ये लपलेली बाटली शोधा; तुमच्याकडे आहेत केवळ ८ सेकंद

SCROLL FOR NEXT