Maharashtra Unseasonal Rain
Maharashtra Unseasonal Rain Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Unseasonal Rain : अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे तातडीने पंचनामे करा; CM शिंदेंचे निर्देश

Shivani Tichkule

CM Eknath Shinde on Unseasonal Rain : राज्यभरात आज मोठ्या उत्साहात धुळवडीला सुरुवात झाली आहे. सकाळपासून तरुणाई रंगात न्हाऊन निघाली आहे. कोरोनाच्या सावटानंतर पहिल्यांदा यंदा निर्बंधमुक्त रंगोत्सव साजरा होत असल्याने तरुणाईंमध्ये आनंद दुणावला आहे. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील धुळवड साजरी केली. तसेच यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांवर भाष्य केलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात कुटूंबासोबत धुळवड साजरी केली. मुख्यमंत्री शिंदे यांनी सहपत्निक धुळवड साजरी केली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही अशी ग्वाही दिली. तसेच, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याचे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

राज्यामध्ये अनेक जिल्ह्यांत अवकाळी पावसामुळे पिकांना फटका बसला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी आज सकाळी मुख्य सचिव तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधून राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतली. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत.

शेतकऱ्यांना तातडीनं दिलासा मिळाला पाहिजे. संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या सरकार पाठीशी आहे. मुंबई, ठाण्यासह उत्तर मध्य महाराष्ट्रावर ढगाळ वातावरण असल्यानं बऱ्याच ठिकाणी आणखी अवकाळी पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. त्यादृष्टीनं मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला आवश्यक त्या सूचनाही दिल्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Voting LIVE: राज्यातील ११ लोकसभा मतदारसंघात थोड्यात वेळात मतदानाला सुरुवात

Lok Sabha Election 2024: बारामतीसह ११ लोकसभा मतदारसंघात आज होणार मतदान; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

Horoscope Today: व्यवहारात सतर्कता बाळगा, सावधगिरीने काम करा; जाणून घ्या तुमचे राशिभविष्य

Rashi Bhavishya: मंगळवार तुमच्यासाठी काय घेऊन आलाय? वाचा राशिभविष्य

Supreme Court: ...तर मानधन सोडा, घशाला आराम द्या; रोहतगींच्या त्या विनंतीवर CJI चंद्रचूड यांचं उत्तर

SCROLL FOR NEXT