Agriculture News : अहमदनगर जिल्ह्यालाही अवकाळीचा फटका; अनेक ठिकाणी पिकं भुईसपाट

Ahmednagar News : या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका गव्हाच्या पिकाला बसला असून अनेक ठिकाणी शेतातील उभी पिकं भुईसपाट झाल्याचं चित्र आहे.
Agriculture News
Agriculture NewsSaam Tv

सचिन बनसोडे

Ahmednagar Farmer News : अहमदनगर जिल्ह्यातील अनेक तालुक्यात पहाटेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका गव्हाच्या पिकाला बसला असून अनेक ठिकाणी शेतातील उभी पिकं भुईसपाट झाल्याचं चित्र आहे.

Agriculture News
Dhule News: वीजबिल थकल्याने ट्रान्स्फॉर्मर सुरू केले नाही; हताश कर्जबाजारी तरुण शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल

अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील संगमनेर, राहाता, कोपरगाव, श्रीरामपूर यासह इतर तालुक्यांमध्ये झालेल्या वादळी पावसाने शेतकऱ्यांची (Farmer) गहू, हरभरा, मका भुईसपाट झाला आहे. राहाता तालुक्यातील कोल्हार गावात अनेक शेतकऱ्यांचा हातात तोंडाशी आलेला गहू भुईसपाट झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. 

कलिंगड आणि द्राक्ष बागांनाही या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. वातावरणातील बदलामुळे कलिंगडावर रोग पडून पिकं खराब झाल्याची परिस्थिती आहे. गेल्या वर्षी झालेल्या पावसाने झालेल्या नुकसानीची मदत अद्यापही अनेक शेतकऱ्यांना मिळाली नाही. त्यातच आता पुन्हा एकदा अवकाळी पावसामुळे (Rain) हात तोंडाशी आलेलं पिक धोक्यात आलं आहे. सरकारकडून केवळ घोषणा सुरू असल्याचे शेतकरी बोलत आहे.

Agriculture News
Udayanraje Bhosale : उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांना मंत्री शंभूराज देसाईंच्या बंगल्यानजीक घेतलं ताब्यात

शेतीमालाला भाव नसल्याने आधिच शेतकरी संकटात सापडला आहे. त्यातच आता अवकाळी सारख्या आस्मानी संकटाने बळीराजाच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. सरकारने बळीराजाला सर्वोतोपरी मदत करण्यासाठी पाऊले उचलावीत एव्हढीच अपेक्षा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com