Maharashtra cabinet meeting  saam tv
मुंबई/पुणे

Cabinet Meeting: मोठी बातमी! फडणवीस सरकारचा महत्वाचा निर्णय, पहिल्या ऑनलाइन मंत्रिमंडळ बैठकित काय चर्चा झाली?

Fadnavis Government Big Decision: आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आला. ही बैठक ऑनलाइन पद्धतीने पार पडली. ॲमिटी विद्यापीठाच्या विस्तारासाठी १५ एकर जमीन देण्याबाबत निर्णय घेण्यात आला.

Priya More
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला

  • आज राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली

  • ॲमिटी विद्यापीठाला १५ एकर जमीन मंजूर

  • रायगडमध्ये शैक्षणिक विस्तारासाठी जमीन वाटप

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला. रायगड जिल्ह्यातील ॲमिटी विद्यापीठाच्या विस्तारासाठी रितनंद बलवेद एज्युकेशन फाऊंडेशनला भाताण येथील जमीन देण्याबाबत निर्णय घेण्यात आला. महसूल व वन विभागांतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे.

रायगडच्या पनवेलजवळ असलेल्या ॲमिटी विद्यापीठाची मुळ संस्था असलेल्या रितनंद बलवेद एज्युकेशन फाऊंडेशन या शैक्षणिक संस्थेला मौजे भाताण येथील १५ एकर जमीन देण्याबाबतची मान्यता आज मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आली. आखाती देशातील संकटानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीबाबत केलेल्या आवाहनानंतर राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठक ऑनलाइन घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ही पहिलीच ऑनलाइन बैठक आज पार पडली. या बैठकीत एकच महत्वाचा निर्णय घेण्यात आला.

रितनंद बलवेद एज्युकेशन फाऊंडेशनच्या या ॲमिटी विद्यापीठांतर्गत १८ शाखांमधून विविध शैक्षणिक अभ्यासक्रम शिकवले जात आहेत. याठिकाणी ५००० पेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यापीठातील इतर अभ्यासक्रम आणि शैक्षणिक विस्तारासाठी संस्थेने महाराष्ट्र सरकारकडे जमिनीची मागणी केली आहे. त्यानुसार सरकारने या विद्यापीठाला १५ एकर जमीन देण्याचा निर्णय घेतला आहे.

रायगडमधील पनवेल तालुक्यात असेलेल्या भाताण येथील ( स.न. ८/०, ९/२, १०/३, १३/५, १४/०,, १६७/१, १७८/०, १८२/४) या आकारीपड जमिनीपैकी सुमारे १५ एकर जमीन विशेष बाब म्हणून देण्यास मंजुरी देण्यात आली. ही जमीन कब्जेहक्काची रक्कम भरून घेऊन वर्ग-२ या धारणाधिकाराने उपलब्ध करून दिली जाणार आहे. या जमिनीचा वापर शैक्षणिक संकुल तसेच खेळाची मैदाने, वसतीगृहे, ग्रंथालय, प्रयोगशाळा अशा शैक्षणिक कारणासाठी केला जाणार असल्याची माहिती विद्यापीठाने दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Attack in Women: 70% महिलांकडून हार्ट अटॅकची 'ही' लक्षणं दुर्लक्षित; अचानक जाणवणारा थकवा असू शकतो मोठा रेड फ्लॅग

Eyebrow Tips : १ हफ्त्यात पातळ आयब्रो करा घनदाट आणि जाड ; घरच्या घरी बनवा हे सीरम

Crime: १६ वर्षीय मुलीवर धावत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार, घरच्यांवर नाराज होऊन घराबाहेर पडली अन् भयंकर घडलं

Samruddhi Expressway : समृद्धी महामार्गावरील दरोड्याचे बीड कनेक्शन उघड; पोलिसांची मोठी कारवाई, मुख्य आरोपीला ठोकल्या बेड्या

Maharashtra News Live Update: अशोक खरातच्या जामिनाला सरकारचा विरोध; ६ लैंगिक अत्याचाराच्या खटल्यांची सेशन्स कोर्टात सुनावणी

SCROLL FOR NEXT