CM Fadnavis On Mahadevi Elephant Saam Tv
मुंबई/पुणे

Mahadevi Elephant Case: 'महादेवी'ला परत आणण्यासाठी सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला मार्ग, नेमकं काय म्हणाले?

CM Fadnavis On Mahadevi Elephant: महादेवी हत्तीणीबाबत आज मंत्रालयामध्ये मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी महादेवी हत्तीणीबाबत प्रतिक्रिया देताना सरकार नांदणी मठासोबत असून याचिका दाखल करणार असल्याचे सांगितले.

Priya More

Summery -

  • नांदणी मठाच्या महादेवी हत्तीला परत आणण्याची जोरदार मागणी केली जात आहे.

  • महादेवी हत्तीणीसंदर्भात आज मंत्रालयात महत्वाची बैठक पार पडली.

  • नांदणी मठासोबत सरकार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली

  • हत्तीनीची निगा राखण्यासाठी सरकार मदत करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

कोल्हापुरमधील नांदणी गावातील महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी जोरदार मागणी केली जात आहेत. आज मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये महादेवी हत्तीणीसाठी महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर या बैठकीमध्ये महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या हत्तीणीला परत आणण्यासाठी सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. 'महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी नांदणी मठाने याचिका दाखल करावी. सरकार देखील याबाबत याचिका दाखल करणार आहे.' , असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी महादेवी हत्तीणीवर पहिलीच प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की, 'नांदणी मठाने महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी याचिका दाखल करावी. नांदणी मठासोबत सरकारही याचिका दाखल करणार आहे. राज्य सरकार ताकदीनिशी नांदणी मठासोबत आहे. महादेवी हत्तीण परत यावी ही सर्वांची इच्छा आहे. हत्तीनीची निगा राखण्यासाठी सरकार मदत करणार आहे. ३४ वर्षांपासून महादेवी हत्तीण नांदणी मठात आहे.' यावरून हे स्पष्ट झाले आहे की, राज्य सरकार देखील या हत्तीणीला परत आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

मंत्रालयामध्ये सुरू असलेल्या या बैठकीकडे नांदणी गावासह संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागले होते. अखेर या बैठकीतून महत्वाचा निर्णय आला. सरकार नांदणी गावासोबत असल्याचे कळताच गावकऱ्यांनी आनंद व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाचे नांदणी ग्रामस्थांनी स्वागत केले खरे पण काही ग्रामस्थांनी सरकारने निर्णय घ्यायला उशिर केला असल्याचे मत मांडले. या बैठकीला राजू शेट्टी देखील उपस्थित राहिले.

दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठातील महादेवी हत्तीणीसंदर्भात राज्य सरकार सकारात्मक आहे. सरकार देखील यासंदर्भात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या निर्णयानंतर नांदणी गावातील ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. गावकऱ्यांनी या निर्णयाबाबत मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. तर, महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी आज गडहिंग्लज तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये हजारो नागरिक सहभागी झालेत. गडहिंग्लज इथल्या दसरा चौक परिसरातून तहसीलदार कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Local Body Polls 2025 : 'पालिका निवडणुकीत VVPT नाही'; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, VIDEO

Ladki Bahin Yojana: जुलै महिन्याचा हप्ता कधी येणार? अधिकृत तारीख आली समोर

State Marathi Film Awards2025: मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा दणक्यात साजरा; कोणकोणत्या नामवंतांचा झाला गौरव? वाचा यादी

Nanded Crime:शिवसेना पदाधिकाऱ्याचा कारमाना;'स्पा सेंटर'च्या नावाखाली चालवायचा कुंटणखाना

Uttarakhand News : उत्तराखंडमध्ये ढगफुटी; नांदेडचे दहा पर्यटक अडकले, VIDEO

SCROLL FOR NEXT