BMC News Saam Tv
मुंबई/पुणे

BMC News: चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना मिळणार आश्रय; ३१ अनधिकृत बांधकामे निष्कासित

BMC News: गौतम नगर येथे आश्रय आवास योजनेअंतर्गत नवीन घरे बांधण्याच्या प्रकल्पातील मोठा अडथळा यानिमित्ताने दूर झाला आहे. गत अनेक वर्षांपासून याठिकाणी अनधिकृत बांधकामांमुळे योजनेच्या अंमलबजावणीला वेग मिळत नव्हता.

Bharat Jadhav

BMC News:

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एफ दक्षिण विभागामार्फत गौतम नगर येथील अनधिकृत बांधकाम निष्कासितक करण्यात आली. बृहन्मुंबई कर्मचाऱ्यांसाठीच्या आश्रय आवास योजनेच्या अंमलबजावणीला अडथळा ठरणारी ही ३१ बांधकामे निष्कासन कारवाईत हटविण्यात आली. मुंबई पोलिसांची मदत घेऊन गौतम नगर येथे एफ दक्षिण विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. (Latest News)

गौतम नगर येथे आश्रय आवास योजनेअंतर्गत नवीन घरे बांधण्याच्या प्रकल्पातील मोठा अडथळा यानिमित्ताने दूर झाला आहे. गत अनेक वर्षांपासून याठिकाणी अनधिकृत बांधकामांमुळे योजनेच्या अंमलबजावणीला वेग मिळत नव्हता. परंतु एफ दक्षिण विभागामार्फत नुकत्याच झालेल्या कारवाईमुळे आता या प्रकल्पाला गती मिळणार आहे. परिणामी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना या योजनेअंतर्गत घरे प्राप्त होऊन निवारा उपलब्ध होईल.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बृहन्मुंबई महानगरपालिकेचे उप आयुक्त (परिमंडळ २) रमाकांत बिरादार आणि एफ दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. एफ दक्षिण विभागातील कामगार आणि अधिकारी मिळून तब्बल १३० मनुष्यबळ आणि त्यांच्या मदतीला ३ जेसीबी, २ डंपर, २ वाहने यांच्या सहाय्याने ही कारवाई तडीस गेली. तर पोलीस दलाचे अधिकारी, कर्मचारी मिळून ९५ जणांचे मनुष्यबळ या कारवाई प्रसंगी बंदोबस्त स्वरूपात तैनात होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नंदुरबार बाजार समितीत ओव्याची मोठी आवक

Crime News : घरगुती वाद टोकाला गेला, काकाने पुतण्याचा झोपेतच काटा काढला; बुलढाण्यातील धक्कादायक घटना

Skin Care : रोजच्या धावपळीत स्किन केअरकडे होतय दुर्लक्ष? मग 'ही' छोटीशी गोष्ट करा अन् चेहरा चमकवा

Anupam Kher: चेहरा वाकडा, बोलायला त्रास...; अनुपम खेर यांना झाला 'हा' आजार, त्यात मुलानेच वाजवली कानाखाली

Solapur Mayor Reservation : देशमुख, काळे की जाधव, सोलापूरचा महापौर कोण? भाजप धक्कातंत्र वापरणार, पाहा कुणाच्या नावाची चर्चा

SCROLL FOR NEXT