CIDCO Announces Prices for 26000 Home Saam Tv
मुंबई/पुणे

CIDCO Lottery 2025: नवी मुंबईत २५ लाखांत घर, सिडकोकडून २६००० घरांच्या किंमती जाहीर; वाचा सविस्तर

CIDCO Announces Prices for 26000 Homes : सिडकोनं 'माझे पसंतीचे सिडकोचे घर' योजनेच्या तब्बल २६००० घरांच्या किमती जाहीर केल्या आहेत. सिडकोंच्या घराच्या किंमती २५ लाखांपासून सुरू होणार आहे.

Priya More

नवी मुंबईमध्ये हक्काचे घर असावे असं स्वप्न असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता सिडकोमार्फत त्यांना स्वस्तामध्ये घर घेता येणार आहे. कारण सिडकोनं 'माझे पसंतीचे सिडकोचे घर' योजनेच्या तब्बल २६००० घरांच्या किमती जाहीर केल्या आहेत. सिडकोंच्या घराच्या किंमती २५ लाखांपासून सुरू होणार आहे. त्यामुळे नागरिकांना अगदी कमी किमतीमध्ये आणि खिशाला परवडेल असं घर घेणं सोपं होणार आहे.

सिडकोने 'माझे पसंतीचे सिडकोचे घर' या योजनेअंतर्गत २६००० घरांच्या ऑनलाइन अर्ज नोंदणीमध्ये ३ वेळा मुदत वाढ दिली. आतापर्यंत हजारो नागरिकांनी या सिडकोच्या या घरांसाठी अर्ज केला आहे. १० जानेवारी २०२५ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. अजूनही अर्ज करण्यासाठी दोन दिवस शिल्लक आहेत. अशामध्ये सिडकोने घरांच्या किंमती जाहीर केल्या आहेत.

सिडकोतर्फे सादर करण्यात आलेल्या 'माझे पसंतीचे सिडकोचे घर' या योजनेंतर्गत २६००० घरं प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गटांसाठी देण्यात येणार आहे. या योजनेतील ही घरं नवी मुंबईतील वाशी, बामणडोंगरी, खारकोपर, खारघर, तळोजा, मानसरोवर, खांदेश्वर, पनवेल आणि कळंबोली नोडमध्ये असणार आहेत. या सिडकोच्या या योजनेमुळे आर्थिकदृष्ट्या मागास असणाऱ्यांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

या योजनेअंतर्गत EWS म्हणजेच ज्यांचे उत्पन्न सहा लाखांपर्यंत आहे अशा आर्थिक दुर्बल घटक गटासाठी २५ ते ४८ लाखांपर्यंत घरांच्या किमती निश्चित करण्यात आल्या आहेत. तर, ज्यांचे वार्षिक उत्पन्न ६ लाखांपेक्षा जास्त आहे अशा अत्यल्प (LIG) गटासाठी घरांच्या किमती ३४ लाखांपासून ९७ लाखांपर्यंत असणार आहे.

आर्थिक दुर्बल घटक EWS -

तळोजा सेक्टर - २८ ते २५.१ लाख

तळोजा सेक्टर - ३९ ते २६.१ लाख

खारघर बस डेपो - ४८.३ लाख

बामणडोंगरी - ३१.९ लाख

खारकोपर 2A, 2B - ३८.६ लाख

कळंबोली बस डेपो - ४१.९ लाख

अल्प उत्पन्न गट (LIG) -

- पनवेल बस टर्मिनस - ४५.१ लाख

- खारघर बस टर्मिनस- ४८.३ लाख

- तळोजा सेक्टर 37 - ३४.२ लाख ४६.४ लाख

- मानसरोवर रेल्वे स्टेशन - ४१.९ लाख

- खांदेश्वर रेल्वे स्टेशन - ४६.७ लाख

- खारकोपर ईस्ट - ४०.३ लाख

- वाशी ट्रक टर्मिनल - ७४.१ लाख

- खारघर स्टेशन सेक्टर वन A- ९७.२ लाख

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Liver Cancer Symptoms: भूक कमी अन् सतत थकवा जाणवतोय? तुम्हाला लिव्हर कॅन्सर तर नाही ना? वाचा लक्षणे

Maharashtra Live News Update: वडापावमध्ये आढळले प्लास्टिकचे तुकडे

Home Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार घराच्या दरवाज्यांना कोणता रंग द्यावा?

GK: ४,००० किमीचा प्रवास! देशातील सर्वात लांब महामार्ग कोणता?

EPFO New Scheme : EPFO ची नवी योजना, १ लाखांपर्यंत पगारदारांना १५ हजारांचा फायदा! ३० एप्रिलपर्यंत नोंदणीची संधी |VIDEO

SCROLL FOR NEXT