Navi Mumbai Crime: पोलीस कॉन्स्टेबलच्या हत्येचं गूढ उकललं; आधी गळा दाबून मारलं, नंतर लोकलसमोर ढकललं

Latest Navi Mumbai Crime News: रबाळे आणि घणसोली या दोन स्थानकांदरम्यान ही थरारक घटना घडली आहे. वाशी रेल्वे पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु केला आहे. दरम्यान हत्येमागील कारण अजूनही अस्पष्ट आहे.
Navi mumbai Police killing Case
Navi mumbai Police killing CaseSaam Tv
Published On

Navi Mumbai Crime: हार्बर रेल्वे मार्गावर एक थरारक घटना घडली आहे. पनवेल रेल्वे पोलीस ठाण्यात कार्यरत एका हेड कॉन्स्टेबलची दोघांनी हत्या केली आहे. आरोपींनी गळा दाबून हत्या करत हेड कॉन्स्टेबलला धावत्या लोकलसमोर ढकलून दिले. मृत हेड कॉन्स्टेबलचे नाव विजय रमेश चव्हाण असल्याची माहिती समोर आली आहे. हा प्रकार रबाळे ते घणसोली या दोन रेल्वे स्थानकांदरम्यान घडला आहे.

रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवार (१ जानेवारी) पहाटे ५.२५ ते ५.३२ च्या सुमारास दोन अज्ञातांनी विजय चव्हाण यांना लोकल ट्रेनसमोर ढकलल्याचे लोकल मोटरमनने सांगितले. त्यानंतर मोटरमनने पोलिसांना संपर्क केला. लगेचच वाशी रेल्वे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांच्या तुकडीला दोन स्थानकांदरम्यान विजय चव्हाण यांना बेशुद्ध अवस्थेमध्ये दिसले. वाशी महानगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी विजय चव्हाण मृत असल्याचे पोलिसांना सांगितले.

प्राथमिक तपासावरुन विजय चव्हाण हे घटनेदरम्यान ऑफ ड्यूटी होते. त्यांच्या अंगावर पोलिसी गणवेश नव्हता. त्याशिवाय त्यांनी मद्यपानदेखील केले होते. त्यांना दोघे मारेकरी मद्यपान करण्यासाठी प्रवृत्त करत होते. दारु पाजल्यानंतर दोघांनी गळा दाबून चव्हाण यांची हत्या केली. त्यानंतर चव्हाण यांना आरोपींनी रबाळे आणि घणसोली रेल्वे स्थानकांदरम्यान येणाऱ्या धावत्या लोकलसमोर ढकलून दिले. आरोपी कोण आहेत, या हत्येमागे त्यांचा काय उद्देश होता हे अजूनही स्पष्ट झालेले नाही अशी माहिती रेल्वे पोलिसांनी दिली आहे.

Navi mumbai Police killing Case
Mumbai Crime: मोठ्या बहिणीवर प्रेम आणि माझा तिरस्कार करते, रागाच्या भरात मुलीने आईलाच संपवले; घटनेने मुंबई हादरली

विजय चव्हाणांच्या मृतदेहाजवळ त्यांचा मोबाईल फोन आढळला. तपासाअंतर्गत पोलिसांनी फोन ताब्यात घेतला आहे. त्याशिवाय पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करायला सुरुवात केली आहे. विजय चव्हाण नववर्षाचे सेलिब्रेशन करुन घरी परतत असताना हा प्रकार घडला असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

Navi mumbai Police killing Case
Pune Crime: चोरीचा नवा फंडा! पुण्यात चोरट्यांनी ट्रॅक्टर ट्रॉली केली लंपास, घटना CCTV मध्ये कैद

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com