सिडकोने नवी मुंबईत एकूण १९,००० घरांसाठी लॉटरी जाहीर केली
लॉटरीसाठी अर्ज करण्याची मुदत १० दिवसांनी वाढवली.
नवी मुंबईत घर घेण्याचं सामान्यांचं स्वप्न होणार पूर्ण
नवी मुंबईतील सिडकोच्या वेगवेगळ्या प्रवर्गातील असलेल्या घरांच्या किंमती थेट १० टक्क्यांनी स्वस्त करण्याची घोषणा महाराष्ट्र सरकारनं केली आहे. नवी मुंबई परिसरात घर घेण्याचे सर्वसामान्यांचे स्वप्न आता अधिक सुकर होणार आहे. त्याचप्रमाणे सिडकोतर्फे नवी मुंबईतील वाशी, बामणडोंगरी, खारकोपर, खारघर, तळोजा, मानसरोवर, खांदेश्वर, पनवेल व कळंबोली या महत्वपूर्ण नोड्समध्ये १९,००० घरांची महागृहनिर्माण योजना दिनांक १४ डिसेंबर २०२५ रोजी जाहिर करण्यात आली आहे.
या योजनेमध्ये नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुक नागरिकांनी www.cidcohomes.com अधिक माहितीसाठी या संकेतस्थळास भेट द्यावी.
सर्व सामान्यांसाठी आता सिकडोकडून (CIDCO) स्वस्तात मस्त घरांची लॉटरी काढली आहे. अटल सेतूपासून जवळ असलेल्या ठिकाणी फक्त २२ लाख रूपयांत घर खरेदी करण्याची संधी आहे. द्रोणागिरी नोडमध्ये सिडकोने स्वस्तात मस्त घरे विक्रीसाठी उपल्बध करून दिली आहेत. या फ्लॅट्सची किंमत अंदाजे 22.18 लाख रूपयांपासून सुरू आहे.
सिडकोकडून स्वस्तात घरे उपलब्ध करून देण्यात येतात. नोव्हेंबर महिन्यात नवी मुंबईमध्ये ४५०८ घरांसाठी लॉटरी काढण्यात आली होती. त्यावेळी "प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य" देण्यात आले होते. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गटासाठी तळोजा, द्रोणागिरी, घणसोली, खारघर आणि कळंबोली येथे घरे उपलब्ध करून देण्यात आली होती. येथे अर्जदार आपल्या आवडीचे घर निवडू शकणार आहे. २२ नोव्हेंबर ते २१ डिसेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. त्यानंतर २८ डिसेंबरपासून थेट आवडीचे घर निवडण्याची सुविधा अर्जदारांना देण्यात आलीय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.