‘झोपु’ वादात छोटा शकीलच्या भावाची उडी - Saam Tv
मुंबई/पुणे

‘झोपु’ वादात छोटा शकीलच्या भावाची उडी

जोगेश्वरी येथील झोपडपट्टी पुनर्विकास योजनेतील वादात आता गँगस्टर छोटा शकीलचा भाऊ अन्वरने उडी घेतली आहे

साम टिव्ही

मुंबई : जोगेश्वरी Jogeshwari येथील झोपडपट्टी पुनर्विकास योजनेतील SRA वादात आता गँगस्टर छोटा शकीलचा Chota Shakeel भाऊ अन्वरने उडी घेतली आहे. त्याने जोगेश्वरीतील बांधकाम व्यावसायिकाला Builder आंतरराष्ट्रीय दूरध्वनी करून धमकावल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेने Crime Branch अन्वरची मदत घेणाऱ्या दोघांना अटक केली आहे. Chota Shakeel Brother enters in SRA Row

तक्रारदार मोहम्मद वसिम अस्लम लष्करीया हे जोगेश्वरीतील बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांचा जोगेश्वरी इन्फेनिजी मॉलजवळ झोपु योजनेअंतर्गत एक प्रकल्प सुरू आहे. त्यातील अपात्र झोपड्यांवरून शेख मोहम्मद अरबाज नईम व कामरान खान ऊर्फ राजू यांच्यासोबत त्यांचा वाद सुरू होता. त्या वादातून नईम याने प्रकल्पातील अपात्र झोपड्यांच्या बदल्यात एका फ्लॅटची मागणी केली होती. या वादात पुढे गँगस्टर छोटा शकीलचा भाऊ शेख नासिर अहमद अन्वर याने उडी घेतल्याची चर्चा आहे.

नईम शेखच्या सांगण्यावरून अन्वरने जोगेश्वरीतील बांधकाम व्यावसायिक अस्लम लष्करीया यांना धमकावले आहे. आरोपीने स्वतःचे नाव छोटा शकीलचा भाऊ अन्वर सांगून नईमच्या मागणीप्रमाणे फ्लॅटची मागणी केली आहे. तसेच, फ्लॅट न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली आहे. धमकीनंतर बांधकाम व्यवसायिकाने याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली होती. Chota Shakeel Brother enters in SRA Row

त्यानुसार याप्रकरणी ओशिवरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करत शेख मोहम्मद अरबाज नईम व कामरान खान ऊर्फ राजू यांना अटक करण्यात आली आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन हे प्रकरण तपासासाठी गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाकडे वर्ग करण्यात आले आहे. आरोपींना १७ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आल्याचेही समजते. हे दूरध्वनी कराचीतून आल्याचा संशय असून त्याबाबत अधिक तपास सुरू आहे.

कोण आहे अन्वर?

१९९३ च्या बॉम्बस्फोटांमध्ये सहभाग असल्याच्या संशयावरून अन्वरच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली आहे. इंटरपोलची रेड कॉर्नर नोटीस असलेल्या अन्वरकडे पाकिस्तानी पासपोर्ट असल्याचे सूत्रांनी सांगितले. २००८ मध्येही अन्वरला दुबईत अटक करण्यात आली होती; मात्र पुराव्यांअभावी त्याची सुटका करण्यात आली होती. १९८८ मध्ये शकील व दाऊद यांनी पाकिस्तानात पलायन केले होते. त्या वेळी अन्वर अंधेरीत बांधकाम व्यवसाय करत असे. या वेळी तो शकीलचा आर्थिक व्यवहार सांभाळत होता. अन्वर विशेष करून हवालामध्ये सक्रिय होता. डी कंपनीच्या खंडणीचा पैसा पाकिस्तानात त्याच्यामार्गेच पोहोचत असे. पुढे त्याचा वापर मुंबई व गुजरातमधील दहशतवादी कारवायांमध्ये करण्यात आला.

Edited By - Amit Golwalkar

हे देखिल पहा -

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: 'विकासकामांचा असली पिक्चर अभी बाकी है', नितीन गडकरी

Curry leaves chutney: कढीपत्त्याची 'ही' चटणी वाढावेल जेवणाची चव

IND vs NZ 2nd Test: सँटनरची 'सुंदर' गोलंदाजी! 7 विकेट्स घेत टीम इंडियाला केलं All Out; न्यूझीलंडकडे मोठी आघाडी

Indrayani: इंदू आणि फंट्या गँगने बनवला मातीचा किल्ला, 'इंद्रायणी' मालिकेत साजरी होणार अनोखी दिवाळी

Camphor Benefits: घरात कापूर पाणी शिंपडल्याने होतात अनेक फायदे!

SCROLL FOR NEXT