नवी दिल्ली : अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या Congress ध्यक्षा व पक्षाच्या माजी खासदार सुश्मिता देव Sushmita Dev यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याने पक्षाला मोठा धक्का बसला आहे. त्यांनी आपल्या ट्वीटरवरही आपल्या प्रोफाईलमध्ये काँग्रेसची माजी सदस्य असा उल्लेख केला आहे. सुश्मिता देव यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी Sonia Gandhi यांना पत्र लिहून आपण पक्ष सोडत असल्याचे कळवले आहे. सुष्मिता देव या टीम राहुलच्या Rahul Gandhi सदस्य होत्या. Congress Women wing chief Sushmita Dev quits Party
सुश्मिता या गेल्या तीन दशकांपासून काँग्रेसशी संबंधित होत्या. त्यांनी आपण पक्ष का सोडत आहोत, याचे कुठलेही कारण दिलेले नाही. सार्वजनिक जीवनात आपण नवा अध्याय सुरु करत आहोत, एवढाच उल्लेख त्यांनी केला आहे. सुश्मिता यांनी पक्षाचा व्हाॅट्सअॅप ग्रुपही सोडल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. काँग्रेसचे नेते संतोष मोहन देव यांच्या सुश्मिता देव या कन्या आहेत.
काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसच्या अनेक नेत्यांची ट्वीटर हँडल ब्लाॅक करण्यात आली होती. त्यात सुश्मिता यांच्या ट्वीटर हँडलचाही समावेश होता. देव यांनी नागरिकत्व सुधारणा विधेयकाबद्दल (CAA) काँग्रेस पक्षाच्या भूमीकेशी विसंगत भूमीका घेतली होती. तेव्हापासून त्या चर्चेत होत्या. आसाम मधील बराक खोऱ्याचं प्रतिनिधीत्व त्या करत होत्या. तेथील जनतेचा सीएएला पाठिंबा असल्याने आपणही या विधेयकाच्या बाजूने आहोत, असे देव यांनी स्पष्ट केले होते.
Edited By - Amit Golwalkar
हे देखिल पहा -
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.