गुलाबराव पाटील आणि रांझ्याचा पाटील यांची वृत्ती सारखीच - चित्रा वाघ (पहा Video) SaamTV
मुंबई/पुणे

गुलाबराव पाटील आणि रांझ्याचा पाटील यांची वृत्ती सारखीच - चित्रा वाघ (पहा Video)

शिवाजी महाराजांनी रांझ्याच्या पाटलाची पाटीलकी काढून घेतली होती त्याप्रमाणे आता गुलाबराव पाटलांची मंत्रीपदावरून हकालपट्टी कधी होणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

रामनाथ दवणे साम टीव्ही मुंबई

मुंबई : शिवसेना नेते तथा जळगावंचे पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी बोदवड नगरपंचायत प्रचार भरसभेत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. 'माझ्या मतदारसंघातील रस्ते हे हेमा मालिनीच्या गालासारखे केले असल्याचे वक्तव्य गुलाबराव पाटीलांनी केलं आहे.गुलाबराव पाटील यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरुन त्यांच्यावरती भाजपकडून जोरदार टीका सुरु आहे. अशातच आता भाजप, प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी तर गुलाबराव पाटलांची तुलना थेट रांझ्याचा पाटीलासोबत केली आहे.

पहा व्हिडीओ -

त्यांनी ट्विटमध्ये लिहलं आहे, 'गुलाबराव पाटील हे तर रांझ्याचा पाटील. शिवसनेनेच्या नेत्यांना झालंय तरी काय? संजय राऊतांच्या वक्तव्यानंतर आता गुलाबराव पाटील हेमा मालिनीबाबत बेताल वक्तव्य करतायत. गुलाबराव पाटील आणि रांझ्याच्या पाटलांची वृत्ती एकच असल्याचंही चित्रा वाघ म्हणाल्या आहेत. शिवाजी महाराजांनी रांझ्याच्या पाटलाची पाटीलकी काढून घेतली होती त्याप्रमाणे आता गुलाबराव पाटलांची मंत्रीपदावरून हकालपट्टी कधी होणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

तसंच शिवीगाळ करणारे संजय राऊत उजळ माथ्यानं फिरत आहेत. गुलाबराव पाटलांना हेमा मालिनीचे गाल दिसतायत मात्र पोलिस यंत्रणांना यामध्ये महिलांचा विनयभंग दिसत नसल्याचं म्हणत त्यांनी थेट गृहमंत्र्यांना आवाहन दिलं आहे, गुलाबराव पाटलांवरती तात्काळ गुन्हा दाखल करा अन्यथा या गाल पाहणा-यांचे थोबाड फोडल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नसल्याचा इशारा देखील चित्रा वाघ यांनी दिला आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan : कुटुंबीय दिवाळी साजरी करण्यात गुंग; अचानक भलंमोठं झाड ३ घरावर कोसळलं, कल्याणमधील घटना

Maharashtra Live News Update: कोकणासह पश्चिम महाराष्ट्रासाठी पुढचे ३ तास महत्वाचे,हवामान विभागाचा इशारा

Mumbai News: भयाण! अंगभर मुंग्या, भूकेने व्याकूळ बालिकेची जीवनासाठी झुंज; दोन ट्रॅव्हल्सच्यामध्ये सापडली नवजात बालिका

Kolhapur : फटाके आणायला गेले,पुन्हा परतलेच नाहीत; बहीण-भावासह पुतणीचा अपघाती मृत्यू, कांबळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर

Goregaon Crime: इमारतीत शिरून मोबाईल चोरीचा प्रयत्न; ५ जणांकडून बेदम मारहाण, हाणामारीत तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT