शर्यतीचा बैल विकत दिला नाही म्हणून; चोरट्यांनी चक्क बैलच नेला चोरून...
शर्यतीचा बैल विकत दिला नाही म्हणून; चोरट्यांनी चक्क बैलच नेला चोरून...SaamTV

शर्यतीचा बैल विकत दिला नाही म्हणून; चोरट्यांनी चक्क बैलच नेला चोरून...

बैलगाडा शर्यतीवर बंदी आल्यानंतर बैलांच्या किंमतीमध्ये मोठी घट झाली होती मात्र बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठली आणि एका रात्रीत बैलांच्या किमती या लाखांवर पोहोचल्या आहेत.
Published on

बारामती : शर्यतीचा बैल विकत दिला नाही म्हणून चोरुन नेल्याची घटना बारामती (Baramati) तालुक्यातील मानाजीनगर येथे घडली आहे. पोलिसांनी एका दिवसात चोरट्यांना पकडुन बैल ताब्यात घेतला असून संयोग संभाजी साबळे प्रवीण शिवाजी घेनंद आणि रोहित संजय यादव या तिघांना बैलचोरी प्रकरणी ताब्यात घेतलं आहे. याबाबत रमेश रामा करगळ यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली होती.

हे देखील पहा -

आजही ग्रामीण भागात गोधन मोठ्या आपुलकीने सांभाळलं जातं ज्यावेळी बैलगाडा शर्यत (Bullock cart race) सुरू होती त्या काळात बैलांना मोठी किंमत देखील मिळत असे मात्र अचानक बैलगाडा शर्यतीवर बंदी आली आणि बैलांच्या किमती अचानक ढासळल्या किमती कमी झाल्या असल्या तरी ग्रामीण भागात बैलांचा सांभाळा हा चांगल्या प्रकारे केला जात होता आणि आजही तो चांगल्या प्रकारे केला जात आहे. बैलगाडा शर्यतीवर बंदी आल्यानंतर बैलांच्या किंमतीमध्ये मोठी घट झाली होती मात्र बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठली आणि एका रात्रीत बैलांच्या किमती या लाखावर पोहोचल्या बंदीच्या काळामध्ये 50 हजार रुपयांमध्ये मिळणारा बैल आता दोन ते तीन लाखापर्यंत विक्री होऊ लागल्याचे व्यापारी सांगतात.

शर्यतीचा बैल विकत दिला नाही म्हणून; चोरट्यांनी चक्क बैलच नेला चोरून...
छत्रपतींच नाव घेण्याची भाजपची लायकी आहे का? शिवसेना नेत्यांचा सवाल (पहा Video)

आम्ही परंपरागत शर्यतीसाठी बैलांचा सांभाळ करीत आलो आहे त्यामुळे अगदी बैलगाडा शर्यतीवर बंदी जरी आली तरी आम्ही बैलांचा सांभाळ पहिल्या सारखाच केला आहे मात्र आता बैलगाडा शर्यतीवर वरील बंदी उठली असून आता बैलांना मागणीही वाढली आहे त्याचबरोबर बैलांच्या खरेदीमध्ये वाढ देखील झाली आहे त्यामुळे आता आमचे उत्पादन वाढणार आहे मात्र बैलांना किमती वाढल्याने आता बैल चोरीच्या घटना देखील घडू लागल्या असल्याने आम्हाला आता सतर्क राहावे लागणार आहे असे शेतकऱ्यांनी सांगितले.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com