Eknath Shinde News Saam Tv
मुंबई/पुणे

Eknath Shinde News: अंमलबजावणी होणार नाही, तिथे कारवाई करू; कोस्टल रोडच्या पाहणीनंतर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

मुख्यमंत्री शिंदे ऑक्शन मोडवर!

Shivani Tichkule

Mumbai Rain News: मुंबईत काल सकाळपासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावली. तर पहिल्याच पावसाने मुंबईची दैना झाली. मुसळधार पावसाने आणि नाले सफाई व्यवस्थित न झाल्याने मुंबईला पहिल्याच पावसात नदीचं स्वरुप प्राप्त झालं. सध्या मुंबईला हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे. मात्र तरी देखील मुंबईकरांना मोठा त्रास सहन करावा लागला.  (Latest Marathi News)

त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भर पावसामध्ये मुंबईतील वरळी येथील कोस्टल रोड परिसराची पाहणी केली. तसेच या ठिकाणी पाणी साचण्याचे कारण देखील जाणून घातले. या भागात पाणी साचू नये यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना एकनाथ शिंदे यांनी तसे निर्देश दिले आहेत.

आज जरी या परिसरात पाऊस (Rain) नसले तरी काल मुंबईत झालेल्य पावसामुळे इथे जागोजागी पाणी साचले होते. त्यामुले परिसर जलमय झाला होता. येथे अनेक वाहने अडकून पडल्याने वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इथे भेट देऊन येथील परिस्थितीचा आढावा घेतला.

पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, ज्या ठिकाणी कामाची योग्य अंमलबजावणी होणार नाही त्या ठिकाणी निश्चित कारवाई करू मात्र प्रत्यक्षदर्शी तशी कुठलीही गोष्ट ही निदर्शनास आलेली नाही त्यामुळे कारवाई करण्याचा प्रश्नच उद्भवलेला नाहीये. (Mumbai Rain)

मुंबईत किती पाऊस झाला?

एकाच दिवसात १०० मिमी पेक्षा जास्त पावसाची नोंद करण्यात आली आहे. काल एकाच दिवसात एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. मुंबई (Mumbai) शहरात १०४ मिमी पाऊस झाला असून पूर्व उपनगरात आणि पश्चिम उपनगरात गेल्या २४ तासांत अनुक्रमे १२३ मिमी आणि १३९ मिमी पाऊस झाला आहे. हवामान खात्याने याची माहिती दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: साकोलीत नाना पटोले पिछाडीवर

Maharashtra Election Result: भाजपला १२०+ जागा मिळणार! निकालाआधीच भाजपच्या नेत्याचा दावा

Amla Pickle: आवळ्याचे लोणचे आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे, जाणून घ्या कारणे...

Maharashtra Election Result : 'महायुतीचे सरकार बनण्यामागे लाडक्या बहिणींचा मोठा हात'

Sanjay Raut Press Conference : हा जनतेचा कौल नाही, हे निकाल अदानींनी लावून घेतलेत; संजय राऊत बरसले

SCROLL FOR NEXT