Pune Accident News: गॅस वाहतूक करणारा टँकर उलटला; मुंबईकडून पुण्याकडे जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम

Pune Accident News: पुण्यातून टँकर अपघाताची मोठी अपघात घडली आहे. गॅस वाहतूक करणारा टँकर उलटल्याची घटना घडली आहे.
Pune Accideent News
Pune Accideent NewsSaam tv
Published On

Pune News: पुण्यातून टँकर अपघाताची मोठी अपघात घडली आहे. गॅस वाहतूक करणारा टँकर उलटल्याची घटना घडला आहे. चालकाचा टँकरवरील ताबा सुटल्याने आज पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला आहे. मुंबईकडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर हा टँकर उलटला आहे. यामुळे या जुन्या महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड शहरात काल मध्यरात्री साडेतीन वाजण्याच्या दरम्यान गॅस कॅप्सूल टँकरचा अपघात झाला. गॅस कॅप्सूल टँकर चालकाचा टँकरवरील ताबा सुटल्याने वाहन उलटून हा अपघात झाला आहे.

मुंबईकडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या बीपीसीएल कंपनीच्या या गॅस टँकरचा अपघात झाला आहे. पिंपरी चिंचवड शहरातील जुन्या पुणे - मुंबई महामार्गावरील मधुकरराव पवळे पुलाच्या सुरुवातीलाच हा अपघात झाला आहे.

Pune Accideent News
Bankura Accident News | बांकुरा येथे 2 मालगाड्या एकमेकांवर आदळल्यानं घडली ही घटना

वायू गळती थांबवण्याचा प्रयत्न सुरू

गॅस टँकरचा अपघात झाल्याची माहिती मिळाल्यांनंतर पिंपरी चिंचवड महापालिकेचे अग्निशमन विभाग घटनास्थळी दाखल झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी वायू गळती थांबवण्याचे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

ज्या ठिकाणी अपघातग्रस्त टँकरमधून गॅस गळती झाली आहे. तो भाग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. तसेच दुपारी तीन वाजेपर्यंत वायू गळती थांबवण्याचा प्रयत्न अग्निशमन विभाग करत आहे.

अग्निशमन दल, पोलीस मदतीला धावले

दरम्यान, टॅकरचा अपघात झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची अग्निशमन विभागाची टीम तसेच मुख्य अग्निशमन अधिकारी विजय थोरात, अग्निशमन अधिकारी चिपाडे, आपत्ती व्यवस्थापन प्रमुख ओमप्रकाश बहिवाल, पोलीस उपायुक्त विवेक पाटील ,सहायक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर, उपायुक्त रविकिरण घोडके, वरीष्ठ पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे व इतर 50 पोलीस पोहोचले. त्यांच्याकडून पुढील कार्यवाही सुरू आहे. सध्या गॅस ट्रान्सफर करण्यासाठी वाहने आलेली असून कार्यवाही सुरू आहे. (Pune Latest News)

Pune Accideent News
Mumbai - Pune Rain News Update | Mumbai - Pune येथे पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज

वाहतुकीवर परिणाम

काल संध्याकाळापासून जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे अनेक जण पर्यटनासाठी घराबाहेर पडत आहे. त्यात जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर प्रवास करणाऱ्यांना वाहतूक कोडींचा त्रास सहन करावा लागण्याची शक्यता आहे. कारण या अपघातामुळे तो भाग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com