Jaya Shetty Case Chhota Rajan 
मुंबई/पुणे

Chhota Rajan : जया शेट्टी हत्याकांड; कुख्यात गुंड छोटा राजनला जन्मठेप, नेमकं प्रकरण काय?

Jaya Shetty Case : मुंबईच्या विशेष न्यायालयाने गुरुवारीहॉटेल व्यावसायिक जया शेट्टी यांच्या हत्येप्रकरणात निकाल दिलाय. या हत्या प्रकरणात गँगस्टर छोटा राजनला दोषी ठरवण्यात आले असून न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावलीय.

Bharat Jadhav

मुंबई : मुंबईतील हॉटेल व्यावसायिक जया शेट्टी हत्याकांड प्रकरणी कुख्यात गुंड छोटा राजनला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. राजनला कोर्टानं दोषी ठरवण्यात आले होते. मुंबईच्या विशेष सीबीआय न्यायालयाने गुरुवारी अंतिम निकाल दिला. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मकोका) विशेष न्यायाधीश ए. एम. पाटील यांनी गुंड छोटा राजनला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

काय आहे जया शेट्टी खून प्रकरण?

जया शेट्टी या हॉटेल व्यावसायिक होत्या. मुंबईतील गोल्डन क्राउन हॉटेलच्या मालकीण होत्या. छोटा राजन टोळीने त्यांच्याकडे खंडणीची मागणी केली होती. त्यासाठी टोळीकडून फोनही येत होते. जया शेट्टीने खंडणीचे पैसे देण्यास नकार दिल्यावर छोटा राजन टोळीच्या दोन सदस्यांनी हॉटेलमध्ये जाऊन त्यांची गोळ्या झाडून हत्या केली. जया शेट्टी यांना पोलिसांनी सुरक्षा पुरवली होती. हॉटेल व्यावसायिक जया शेट्टी हिची हत्या ४ मे २००१ रोजी झाली होती. या प्रकरणी छोटा राजनला जन्मठेपेची शिक्षा आणि १६ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

जया शेट्टी यांनी खंडणी देण्यास नकार दिल्यामुळे ग्रँट रोडमधील गोल्डन क्राऊन हॉटेलमध्ये राजनच्या हस्तकांनी त्यांची हत्या केली होती. छोटा राजन गँगने रवी पुजारीमार्फत जया शेट्टींकडून ५० कोटींची खंडणी मागितली होती. या प्रकरणातील इतर आरोपी अजय मोहिते, प्रमोद धोंडे आणि राहुल पावसरे यांना कोर्टाने वर्ष २०१३ मध्येच दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावलीय. आता या प्रकणात छोटा राजन यालाही शिक्षा झालीय.

दाऊदचा नीकटवर्तीय होता छोटा राजन

छोटा राजन सध्या तिहार तुरुंगात आहे. त्याला पहिल्यांदा इंडोनेशियातील बाली विमानतळावरून अटक करण्यात आली होती, तेथून त्याला २०१५ मध्ये भारतात आणण्यात आले होते. छोटा राजन हा एकेकाळी दाऊद इब्राहिमचा जवळचा मानला जात होता, परंतु १९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटानंतर दोघांचे मार्ग वेगळे झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wardha News : अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेसमध्ये सीटवर बसण्यावरून वाद; तरुणाकडून प्रवाशावर ब्लेडने सपासप वार

Viral Video: मी आता आझाद झालोय! घटस्फोटाच्या आनंदात पठ्ठ्याची दुधाने अंघोळ, व्हिडिओ व्हायरल

Stunt Artist Raju Death : सिनेमाच्या सेटवर मोठी दुर्घटना; प्रसिद्ध कलाकाराचा जागीच मृत्यू

प्रवीण गायकवाड यांना काळं फासलं; संभाजी ब्रिगेड आक्रमक

युतीसाठी ठाकरेसेनेचं रोखठोक,ठाकरेंचा चेंडू शिवतीर्थच्या कोर्टात,राज ठाकरेंचे मौन कधी सुटणार?

SCROLL FOR NEXT