
मुंबई: भारताचा मोस्ट वॉन्टेड गँगस्टर दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) सध्या कराचीतच आहे असा खुलासा त्याचा पुतण्या अलीशाह पारकर याने ईडीसमोर (Enforcement Directorate) केला आहे. सणासुदीच्या दिवशी माझे कुटुंब दाऊदच्या पत्नीच्या संपर्कात असते. पारकर म्हणाला की, दाऊद इब्राहिमने 1986 नंतर भारत सोडला असून तो सध्या पाकिस्तानातील कराचीमध्ये असल्याची माहिती जवळच्या सूत्रांकडून मिळाली आहे. दाऊद इब्राहिमला संयुक्त राष्ट्राने जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केले आहे.
दाऊद इब्राहिम हा माझा मामा आहे. दक्षिण मुंबईतील डंबरवाला इमारतीच्या चौथ्या मजल्यावर तो 1986 पर्यंत राहत होता. मी माझ्या जवळच्या नातेवाईकांकडून ऐकले आहे की तो आता कराचीमध्ये आहे असे पारकरने ईडीसमोर सांगितले. पारकर पुढे म्हणाला, 'जेव्हा दाऊद कराचीला गेला होता तेव्हा माझा जन्मही झाला नव्हता. आता मी किंवा माझे कुटुंब त्याच्या संपर्कात नाही. होय, पण कधी-कधी ईद, दिवाळी किंवा इतर कोणत्याही सणाच्या निमित्ताने मी त्याची पत्नी मेहजबीन दाऊद इब्राहिमच्या संपर्कात असतो. तो माझी पत्नी आयशा आणि माझ्या बहिणींच्या संपर्कात असतो.'
अनेक दहशतवादी कारवायांमध्ये दाऊदचा हात
दाऊद इब्राहिम भारतातील अनेक दहशतवादी प्रकरणांमध्ये वॉण्टेड असून, त्याचा अनेक दिवसांपासून शोध सुरू आहे. यापूर्वी, राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) 13 मे रोजी मुंबईमधून गँगस्टर छोटा शकीलच्या दोन साथीदारांना अटक केली होती. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमद्वारे चालवल्या जाणार्या गुन्हेगारी सिंडिकेटचे बेकायदेशीर आर्थिक व्यवहार हाताळल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक केली होती, ज्यांची ओळख पटली होती. आरिफ अबुबकर शेख (59) आणि शब्बीर अबुबकर शेख (51) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
एनआयएची अनेक ठिकाणी छापेमारी
दोन्ही आरोपींचे छोटा शकीलशी जवळचे संबंध आहेत. नुकत्याच मुंबई आणि ठाण्यात विविध ठिकाणी टाकलेल्या छाप्यांमध्ये एनआयएने तपासासाठी अनेक संशयितांचा ताब्यात घेतेले आहे. डी कंपनीशी संबंध असल्याबद्दल अटक करण्यात आलेल्या संशयितांमध्ये आरिफ आणि शब्बीर यांचाही समावेश आहे.
मोस्ट वाँटेड दाऊद इब्राहिमच्या साथीदारांविरुद्ध एनआयएने काही काळापूर्वी मुंबई आणि लगतच्या ठाणे जिल्ह्यात 20 हून अधिक ठिकाणी छापे टाकले होते. आरिफ आणि शब्बीर यांच्या चौकशीदरम्यान, एनआयए टीमला या दोघांचे छोटा शकीलसोबत काही व्यवहार असल्याचे आढळले, त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. छोटा शकील पाकिस्तानातून आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी सिंडिकेट चालवतो. शकीलचा खंडणी, अंमली पदार्थांची तस्करी आणि दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग आहे.
Edited By: Pravin Dhamale
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.