Chhagan Bhujbal On Mahayuti leaders saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : महायुतीच्या सगळ्याच नेत्यांना बुद्धी द्या!; भुजबळांचा रोख कुणाकडे?

Mahayuti Political News : विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जागावाटप किंवा उमेदवारीबाबत जाहीरपणे वक्तव्ये करणाऱ्या महायुतीच्या नेत्यांना छगन भुजबळ यांनी चांगलेच सुनावले आहे.

Nandkumar Joshi

Chhagan Bhujbal on Mahayuti : महायुती म्हणून पुढे जायचं असेल तर, सगळ्यांचे मानपान राखून सर्वांना न्याय देत पुढे जावं लागणार, असा सल्ला देतानाच महायुतीच्या सगळ्याच नेत्यांना बुद्धी द्या, अशी गणेशाच्या चरणी प्रार्थना करतो, असं विधान महायुतीतील ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी केलं. याशिवाय विधानसभा निवडणुकीपर्यंत आयाराम गयाराम सुरूच राहणार असं सांगतानाच, महाराष्ट्राचं राजकारण भविष्यात कसं असेल याबाबतची दिशा स्पष्ट केली.

विधानसभा निवडणुकीआधीच महायुतीत फटाके फुटण्यास सुरुवात झाली आहे. महायुतीच्या नेत्यांकडून वेगवेगळी वक्तव्ये येत आहेत. शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनीही आमचं १०० जागा जिंकण्याचं टार्गेट आहे, असं विधान करून महायुतीच्या वर्तुळात खळबळ उडवून दिली. त्यावर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली.

संजय गायकवाड काय म्हणाले होते? (VIDEO बघा)

'मागण्या करण्यात काहीही चूक नाही'

महायुतीतील सर्वच पक्षांना न्याय मिळेल. कुणावरही अन्याय होणार नाही, हेच आश्वासन दिल्लीतील नेत्यांनीही दिलं आहे. आमदार आणि मंत्री आपापल्या परीनं काहीही बोलत असतात. मागण्या करण्यात काहीही चूक नाही. महायुती म्हणून पुढे जायचं असेल तर, सगळ्यांचा मानपान राखूनच न्याय देत पुढे जावं लागणार आहे. महायुतीच्या सर्वच नेत्यांना बुद्धी द्या, अशी प्रार्थना मी गणेशाच्या चरणी करतो, असं छगन भुजबळ म्हणाले.

'आपल्यातील मतभेद जनतेत जाता कामा नये'

महायुतीच्या नेत्यांनाही छगन भुजबळ यांनी सल्ला दिला. आपापसांत वाद होतील अशी वक्तव्ये करू नका. आपल्यात मतभेद आहे, असे चित्र जनतेत जाता कामा नये, असंही भुजबळ यांनी सांगितलं.

गेल्या काही दिवसांपासून नेते, कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचे पक्षप्रवेश सुरू आहेत. त्यावरही भुजबळांनी भाष्य केले. एक दोन ठिकाणी असेच होणार आहे. सध्या शिवसेनेचे दोन, राष्ट्रवादीचे दोन असे मिळून एकूण सहा पक्ष झाले आहेत. तीन पक्ष एका ठिकाणी, तीन पक्ष दुसऱ्या ठिकाणी आहेत. काही ठिकाणी विद्यमान आमदार असल्याने उरलेल्या लोकांना इकडेतिकडे जावे लागणार आहे. निवडणुकीपर्यंत दोन्ही बाजूंनी आयाराम गयाराम सुरूच राहणार, असेही ते स्पष्टपणे म्हणाले.

आपापसांत वाद होतील अशी वक्तव्ये करू नका. आपल्यात मतभेद असल्याचे चित्र जनतेसमोर जायला नको.
- छगन भुजबळ, राष्ट्रवादी काँग्रेस

काळजी घ्यावी, भुजबळांचं आवाहन

महायुतीतील सगळे कार्यकर्ते, नेते एकत्रच आहेत हे चित्र जनतेसमोर जाणं गरजेचं आहे. अतिशय चांगले उपक्रम महायुतीने राबवले आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मोफत सिलिंडर, मुलींना मोफत शिक्षण अशा योजना आहेत.

वातावरण चांगले होत असताना आपापसांत मतभेद असल्याचं चित्र जनतेसमोर जाऊ नये याची काळजी घेतली पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला.

आरक्षणावर पुन्हा भाष्य

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात यावे का? असे उद्धव ठाकरे, शरद पवार किंवा एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार असतील; त्यांना विचारण्यात यावे. मला खात्री आहे की असं कोणीही म्हणणार नाही. सगळ्यांचं असंच म्हणणं आहे की मराठा समाजाला वेगळं आरक्षण मिळावं आणि कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू नये. महायुतीने मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिले आहे, असे भुजबळ म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Night Jasmine: घराच्या बागेत लावा पारिजातकाचं झाड, मनमोहक सुगंधाने बहरेल तुमची बाग

Saam Exit Poll : सावंत की पडळकर? मतदारांचा कौल कुणाला, पाहा एक्झिट पोल VIDEO

Arjuni Morgaon Exit Poll : अर्जुनी मोरगाव मतदारसंघात कोण होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: औसामध्ये भाजपचे अभिमन्यू पवार होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra exit polls : माकप डहाणूचा गड राखणार का? कोण होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT