Chhagan Bhujbal Saam TV
मुंबई/पुणे

कपडे काढून घ्यायचे अन् लंगोट द्यायचा; विरोधकांच्या टीकेला भुजबळांचं उत्तर

'केंद्रावर दोषारोप हाच पुरूषार्थ समजण्याची चूक आणखी किती काळ करणार? आतातरी पेट्रोल-डिझेलचे दर महाराष्ट्रात तत्काळ कमी करा'

सुमित सावंत, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : पन्नास रुपयांचं पेट्रोल, सव्वाशे रुपये करायचं आणि पुन्हा दहा रुपये कमी करायचे हा कोणता न्याय, सगळे कपडे काढून घ्यायचे आणि त्यानंतर एखादा लंगोट द्यायचा, पण बाकीच्या कपड्यांचं काय? असा प्रश्न उपस्थित करत राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी पेट्रोल-डिझेलच्या दर कमी करण्याबाबतच्या विरोधकांच्या टीकेला उत्तर दिलं आहे.

केंद्र सरकारने ३१ मे २०२२ पर्यंतचा GST परतावा जानेवारीपर्यंतच्या कम्पेन्सेशनसह संपूर्ण रक्कम केंद्र सरकारने सर्व राज्यांना दिली असून, यामध्ये महाराष्ट्राला सर्वाधिक १४,१४५ कोटी दिले आहेत. त्यामुळे आता तरी पेट्रोल-डिझेलचे (Petrol-Diesel) दर महाराष्ट्रात कमी करणार की पुन्हा आज १ जूनपासूनचे शिल्लक दाखवून केंद्रावर खापर फोडत धन्यता मानणार?

राज्य सरकार म्हणून कर्तबगारी दाखविण्याची वेळ जेव्हा-जेव्हा महाविकास आघाडीवर (MVA) आली, तेव्हा प्रशासनाची 'ढकलगाडी' करण्यातच त्यांनी धन्यता मानली. केंद्रावर दोषारोप हाच पुरूषार्थ समजण्याची चूक आणखी किती काळ करणार? आतातरी पेट्रोल-डिझेलचे दर महाराष्ट्रात तत्काळ कमी करा, असं ट्विट करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

फडणवीसांच्या याच टीकेला उत्तर देताना भुजबळ म्हणाले, 'पन्नास रुपयांचे पेट्रोल सव्वाशे रुपये करायचं आणि पुन्हा दहा रुपये कमी करायचे हा कोणता न्याय? सगळे कपडे काढून घ्यायचे आणि त्यानंतर एखादा लंगोट द्यायचा, पण बाकीच्या कपड्यांचा काय असा टोला त्यांनी लगावला.

हे देखील पाहा -

तसंच तुमचा ३ महिन्यांचा पगार रखडला असेल आणि तुम्हाला २ महिन्यांचा दिला तर मग उरलेला देणार नाही का? आमचा अख्खा जीएसटी द्या आणि वेळेवर द्या; केंद्राने जीएसटी सोडावी आणि आम्हाला सांगावं, सेल्स टॅक्स गोळा करा मग प्रश्नच उरणार नाही, त्यांच्याकडे बोट दाखवायची गरज उरणार नाही असंही भुजबळ म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

7 minutes after death: मृत्यूनंतर 7 मिनिटांत काय घडतं? पाहा वैज्ञानिक दृष्टीकोनातून समोर आलेल्या धक्कादायक गोष्टी

GK: महिलांनी साष्टांग नमस्कार का टाळावा? काय आहे यामागचं शास्त्रीय कारण

Pune: रेव्ह पार्टीचा 1:42 मिनिटाचा INSIDE VIDEO समोर; २ तरूणी अन् मित्रांसोबत खडसेंचा जावई नशेन धुत

Akola News : लग्नाचं आमिष दाखवतं कॅफेत घेऊन गेला; २९ वर्षीय तरुणाचे ३३ वर्षीय महिलेवर अत्याचार

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

SCROLL FOR NEXT