mumbai pune expressway, accident
mumbai pune expressway, accident saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Pune Expressway : मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर रसायनाने भरलेल्या टॅंकरला अपघात

दिलीप कांबळे

Mumbai Pune Expressway Accident : मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर उर्से टोल नाक्याजवळ भरधाव वेगातील टॅंकरचा अपघात (accident) झाला. हा टॅंकर रसायनाने भरला हाेता. या अपघातामुळं काही काळ येथील वाहतुक खाेळंबली हाेती.

या टॅंकरच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला अशी प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झालेले नाही. मात्र हा टॅंकर रसायनाने भरलेल्या असल्याने त्यातून रसायनाची गळती सुरु झाली आणि अन्य महामार्गावरुन ये-जा करणा-यांची डाेळ्यांची जळजळ हाेत हाेती.

या टॅंकरमध्ये नेमकं काेणते रसायन हाेते याची माहिती पोलिस विभागास देखील मिळू शकली नाही. मुंबईकडून पुण्याकड़े येणाऱ्या लेनवर हा अपघात झाला हाेता. त्यामुळे काही काळ वाहतुक खाेळंबली हाेती. हा अपघातग्रस्त टॅंकर बाजूला केल्यानंतर दाेन्ही लेनची वाहतुक सुरळीत झाली.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: भाजप हा 'आरक्षण रद्द करा' टोळीचा अड्डा आणि मोदी त्यांचे नेते, राहुल गांधी यांचा हल्लाबोल

Nashik News: सासरच्या छळाला कंटाळून महिलेने उचललं टोकाचं पाऊल, 2 मुलांसह संपवलं जीवन

Weekly Horoscope: उद्यापासून सुरू होणार या 5 राशींचे अच्छे दिन, पुढील 7 दिवस जीवनात राहणार आनंद

Today's Marathi News Live: सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची दोन मुलांसह शेततळ्यात आत्महत्या

Bhiwandi Fire: भिवंडीत प्लास्टिकच्या कंपनीला भीषण आग

SCROLL FOR NEXT