Pune Mumbai Expressway : पुणे मुंबई एक्सप्रेसवे वर ट्रकचा ब्रेक फेल झाला अन्...

या अपघाताचा तपास खोपोली पोलीस करीत आहेत.
accident, pune mumbai express highway, khopoli police
accident, pune mumbai express highway, khopoli police saam tv
Published On

Pune Mumbai Expressway : पुणे मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गावर आज (साेमवार) भीषण अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू तर दोन जण किरकोळ जखमी (injured) झाले आहेत. या अपघातामुळं महामार्गावरील वाहतुक काळ खाेळंबली हाेती.

पुणे मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गावर झालेल्या अपघातात खोपोली येथे एका ट्रकने पुढील चार चाकी, राज्य परिवहन महामंडळाची (Shivneri Bus) बस व कंटेनरला धडक दिल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या घटनेत एकाचा मृत्यू तर दोन किरकोळ जखमी झाले आहेत असे खोपोली पोलीसांनी सांगितले.

accident, pune mumbai express highway, khopoli police
Breaking News : मुंबई गाेवा महामार्ग वाहतुकीस बंद; राजापूर बाजारपेठेत शिरलं पाणी

खोपोली पोलीसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार हा अपघात खोपोली एग्जीटच्या थोडे पुढे झाला. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने तो पुढे असलेल्या कार व शिवनेरी बसला धडकला.

accident, pune mumbai express highway, khopoli police
Pandharpur Crime News : शेतात पाणी देण्यासाठी गेलेल्या युवकाचा खून

त्यानंतर तो ट्रक एका कंटेनरवर जाऊन जोरदार आदळला. या ट्रकचा पुढचा भाग पूर्ण चकाचूर झाला आहे. या घटनेचा ट्रक चालकाचा मृत्यू झाला आहे असे पाेलिसांनी सांगितलं. या अपघाताचा तपास खोपोली पोलीस करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

accident, pune mumbai express highway, khopoli police
Maharashtra Rain Update : महाराष्ट्रात पावसाचा हाहाकार! वाचा कूठं काय घडलं

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com