नाशिकच्या (Nashik) दिंडोरीमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. सासरच्या छळाला कंटाळून एका महिलेने टोकाचे पाऊल उचलले. या महिलेने आपल्या दोन मुलांसह शेततळ्यात उडी मारून आत्महत्या केली. याप्रकरणी नाशिकच्या दिंडोरी पोलिसांनी (Dindori Police) महिलेचा पती, सासू आणि दिराविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिंडोरी तालुक्यातील खतवड येथे विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून आपल्या दोन मुलांसह आत्महत्या केली. या महिलेने मुलांसह शेततळ्यात उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी महिलेच्या नातेवाईकांनी पोलिस ठाण्यात धाव घेत तिचा पती, सासू आणि दिराविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या तिघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करत अटक केली आहे.
चांदवड तालुक्यातील धोंडगव्हाणवाडी येथील चंद्रकांत नारायण पूरकर यांची मुलगी अश्विनीचे २०१२ मध्ये खतवड येथील अर्जुन सुदाम मुळाणे या तरुणासोबत लग्न झाले होते. लग्नानंतर माहेरून पैसे आणण्यासाठी अश्विनीच्या सासरच्या मंडळींकडून तिचा छळ सुरू झाला. पुरकर कुटुंबियांनी वेळोवेळी पैसे देत भांडण मिटवण्याचा प्रयत्न केला.मात्र अश्विनीचा नवरा अर्जुन सुदाम मुळाणे, सासू हिराबाई, दिर प्रमोद वेळोवेळी छळ करीत तिला मारहाण करत होते.
सतत माहेरून पैसे आणण्यासाठी सासरची मंडळींकडून अश्विनीचा छळ सुरूच होता. याच छळाला कंटाळून अश्विनीने रविवारी टोकाचे पाऊल उचलले. अश्विनीने तिचा मोठा मुलगा सिद्धेश अर्जुन मुळाणे आणि छोटा मुलगा विराज अर्जुन मुळाणे यांच्यासह शेततळ्यात उडी मारून आत्महत्या केली. अश्विनी आणि तिच्या मुलांच्या आत्महत्येच्या घटनेने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. या घटनेप्रकरणी हळहळ व्यक्त केली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.